मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप नेते नारायण राणेंवर टीका केली होती. याला प्रत्युत्तर देत भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर बोचरी टीका केली होती.
राज्य सहकारी बँक लुटली, सहकारी साखर कारखाने आजारी पाडून कवडीमोल किंमतीत खरेदी करून स्वतःच्या कुटुंबियांच्या नावे केले. ज्याचं नाव लिहून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतात तो माणूस सिंधुदुर्गात येऊन सहकारातील ज्ञान पाझळतो, असं म्हणत निलेश राणेंनी अजित पवारांवर टीका केली होती.
अजित पवार स्वतःच्या नाकातला शेंबुड पुसा अगोदर, अशी बोचरी टीका निलेश राणेंनी अजित पवारांवर केलीये. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी निलेश राणेंना सुनावलं आहे.
वडिलांच्या खांद्यावर बसूनही अजित पवार यांच्या नाकापर्यंत उंची भरणार नाही, असा खोचक टोला रुपाली ठोंबरे पाटील यांनी निलेश राणेंना लगावला आहे.
पराभूतसम्राट सांगे लोकांना, शेंबुड त्याच्याच नाकाला, अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. रूपाली पाटील यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
दरम्यान, ज्यांच्या नेतृत्वाखालील बँकेत सतीश सावंत काम करत होते ते काय काय काम सांगत होते हे जिल्ह्याला माहित आहे. संस्था उभ्या करायला डोके आणि अक्कल लागते, पण बंद करायला अक्कल लागत नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना टोला लगावला होता.
कारभार करायला अक्कल लागते, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांचं हे वक्तव्य अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून होतं, असं प्रत्युत्तर नारायण राणेंनी अजित पवारांना दिलंय.
चा”राणे” ने आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसूनहि “अजितदादा” च्या नाकापर्यंत राजकीय उंची भरणार नाही. #पराभूतसम्राट सांगे लोकांना, शेम्बुड त्याच्याच नाकाला
— Rupalipatilthombare (@Rupalispeak) December 28, 2021
महत्त्वाच्या बातम्या-
मधुमेह असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण!
‘…तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा’; Omicron चं सुरुवातीचं लक्षण आलं समोर
मुंबईकरांना यंदाही थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करता येणार नाही, पालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“…तर राज्य सरकार राज्यपालांविरोधात सर्वोच्च न्यायालयातही जाऊ शकतं”