Top news पुणे महाराष्ट्र

“केतकीला चांगला चोप देणार, चार पाच छान चापट्या दिल्या ना…”

Rupali Patil and Ketaki Chitale

पुणे | अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिनं तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टनंतर ती ट्रोल होत असून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. केतकी विरोधात कळव्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान केतकीला अटक होण्याची देखील शक्यता आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केतकीचं वय काय. तिचं वयही नाही की तीने शरद पवारांवर टीका करावी. तिची तेवढी पात्रताही नाही. तिच्या आजोबांच्या वयाच्या असलेल्या माणसाला ती अशी भाषा वापरते. ती मनोरूग्ण आणि गंजाडी अभिनेत्री आहे, अशी टीका रूपाली पाटील यांनी केली आहे.

केतकीला तिच्याच भाष्यात उत्तर देण्यात येईल. तिला चांगला चोप देण्यात येणार आहे. तिला चार पाच छान चापट्या दिल्या ना ती आजारातून लवकर बरी होईल, असं रूपाली पाटील म्हणाल्यात.

केतकीचा नंबर आम्ही फेसबुकला टाकणार आहोत. तिला तिच्याच नाहीतर अत्यंत खालच्या दर्जात तिला कमेंट करायला सांगणार, असंही त्या म्हणाल्यात.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर…’; नवनीत राणांचं उद्धव ठाकरेंना नवं आव्हान 

मुंबईतील सभेपूर्वी उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता लवकरच… 

 चिंतन शिबीर सुरू असतानाच काॅंग्रेसला जोर का झटका; ‘या’ मोठ्या नेत्यानं सोडला पक्ष

 “बुस्टर डोस माहिती नाही पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल”

 “ज्यांनी बोलायला पाहिजे ते तर मोदींचे दास झालेत”तेक