“का लोकांची घरं बरबाद करताय चित्राताई, उद्या तुम्ही ब्ल्यू फिल्म टाकाल अन्…”

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील हा व्हिडीओ ट्विट करत नाना पटोलेंवर टीका केली होती.

या व्हिडीओत एक व्यक्ती चेरापुंजी, मेघालय येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत खुर्चीवर बसल्याचं दिसत आहे. त्या व्यक्तीने टि-शर्ट घातला असून नाना पटोलेंचेही तशाच टी-शर्टमधील फोटो या व्हिडीओत जोडण्यात आले आहेत. तर व्हिडीओतील ती व्यक्ती नाना पटोले असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. आता यावर प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.

नाना पटोले यांच्या खासगी आयुष्यातील व्हिडीओ ट्वीट करण्याच प्रयोजन काय? असा प्रश्न रुपाली ठोंबरेंनी वाघ यांना विचारला आहे. तसेच तुम्ही ब्ल्यू फिल्म सोशल मीडियावर टाकाल आणि त्याचंही उत्तर मागाल, असं कुठे करतात का चित्रा ताई?, असा सवाल त्यांनी केला आहे.

का लोकांची घरं बरबाद करताय चित्राताई. तुम्ही व्यक्तिगत आयुष्यात ढवळा-ढवळ करू नका, हे तुम्हाला शोभत नाही , उद्या तुम्ही हनिमून करतानाचे व्हिडिओ टाकून त्याचं उत्तर मागाल, अशी टीकाही त्यांनी केलीये.

शिवसेना आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांनीच एका तरुणीचा बळी घेतला, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. मात्र आता ते तुमच्या पक्षात आले म्हणून ते आता आरोप कुठे गेले? मुळात कायद्यामधली तरतुदी नुसार संमतीने ज्यांचे संबंध आहेत, ते एकत्र राहू शकतात, म्हणून ताई तुम्ही जरा कायद्याचा अभ्यास करा, असा टोला रुपाली पाटलांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आलीये” 

राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याला ईडीचा झटका; केली मोठी कारवाई 

‘महाराष्ट्रातही धर्मांतर विरोधी कायदा करा’; नितेश राणेंची सरकारकडे मागणी 

उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, म्हणाले… 

यंदाचे सर्व सण धुमधडाक्यात साजरे होणार, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा