पुणे | मनसेला रामराम करत रूपाली पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर मनसे नेते वसंत मोरे यांनी रूपाली पाटील यांच्यावर टीका केली. या टीकेला रूपाली पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
वसंत मोरेंनी यापुढे वायफळ बडबड करु नये, नाहीतर मीही त्याच पद्धतीने उत्तर देईल, असं म्हणत त्यांनी रूपाली पाटील यांनी वसंत मोरेंना सुनावलं आहे. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर रुपालीचा पाटीलचा राष्ट्रवादीतिल प्रवेश हा प्री प्लॅन होता.आता केवळ पक्षातील नेत्यांकडून त्रास होतोय म्हणून पक्ष बदला हे म्हणणे हास्यस्पद आहे, असं वसंत मोरे म्हणाले.
पक्षातील रिकामटेकडे नेते असं पाटील म्हणाल्या त्यांनी दाखवून द्यावं , कोण रिकामटेकडे आहेत ते? तसेच राजीनामा देऊन त्यांनी राजकीय आत्महत्या केल्याची टीका ही वसंत मोरे यांनी केली होती.
पक्षात कोणत्या प्रकारचे बदल होत नव्हते हे बघून मी स्वत: बदलायचे ठरवेल आणि तसं घडत गेलं. मला असं वाटतंय की वसंत भाऊ वायफळ बडबड करत आहे. आम्ही एकत्रित काम केल आहे, अगदी बहीण भावंडाप्रमाणे, त्यामुळे वसंतभाऊबदल बोलताना मी शांत आहे. पण एका मर्यादेपर्यंतच मी शांत राहू शकते, असं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मी समोरासमोर, कुणालाही न घाबरता स्पष्ट पणे बोलणारी रुपाली पाटील असल्याचंही त्या म्हणाल्या. त्याबरोबरच राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अजित पवार जी काही जबाबदारी देतील ती प्रामाणिकपणे पार पाडेल अशी माहिती रूपाली पाटील यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट”
“लग्नाला उशीर केल्यास मुली पॉर्न पाहत बसतील, त्यामुळे वयात आल्यावर त्याचं लग्न लावा”
रोहित पाटलांच्या ‘बघून घेतो’च्या भाषेवर अजित पवार म्हणाले…
महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर; Omicron बाबत तज्ज्ञांचा धक्कादायक दावा