पुणे | मी संघर्ष करणारी कार्यकर्ती आहे. मी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे पाहूनचं मनसेमध्ये आले आहे. संदीप देशपांडे आणि वंसत मोरे आम्ही भावंड म्हणून काम केलं आहे. संदीप देशपांडे, वसंत मोरे काही बोलले असतील, त्यांना आता उत्तर देणार नाही, मात्र योग्य वेळ आल्यावर उत्तर देईन, असं रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी म्हटलं आहे.
14 वर्ष काम करत असताना माझ्याकडून सर्वसामान्य लोकांकडून अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करत असताना माझ्या पक्षाला, माझ्या नेत्याला त्रास होऊ नये, अशी भूमिका असल्याचं रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं. त्या पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी राज ठाकरे आणि मनसेचे (MNS) कार्यकर्ते यांना माझ्या स्वार्थासाठी वाईट बोलणार नाही. मनसेच्या काही नेत्यांसदर्भात मी पक्षाच्या चौकटीत राहून माझी अडचण राज ठाकरे यांना कळवली आहे. परंतु, काही कारणांमुळं मी राजीनामा देत आहे, असं रूपाली ठोंबरे यांनी सांगितलं आहे.
लोकांना न्याय देत असताना खंबीर साथीची गरज असते, हे मी राज ठाकरे यांना कळवलं आहे. काही बाबतीत बदल घडत नसेल तर मला स्वत:मध्ये बदल घडवावा लागेल, असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्यात.
दरम्यान, पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या दौऱ्यावर उद्या पुण्यात येत आहे. पण राज ठाकरे पुण्यात पोहोचण्याआधीच रुपाली पाटील ठोंबरे यांनी राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली.
काही दिवसांपूर्वीच रुपाली पाटील यांनी पक्षातील अंतर्गत कलहामुळे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षांतर्गत वादामुळे मनसेला रामराम ठोकल्याचं बोललं जात आहे.
रूपाली पाटील या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आल्या होत्या. कोरोनाच्या काळात कामानिमित्ताने अनेक वेळा रुपाली पाटील या अजितदादांच्या बैठकीला हजर होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून रूपाली पाटील ठोंबरेंनी दिला राजीनामा; खरं कारण आलं समोर
तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होणार; पुणे म्हाडाने केली ही मोठी घोषणा
‘हिंमत असेल तर…’; चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडीला खुलं आव्हान
St worker strike | अनिल परब अॅक्शन मोडमध्ये; उचललं मोठं पाऊल