राज ठाकरेंचं भाषण भाजपने स्क्रिप्ट केलेलं यात शंकाच नाही- रूपाली ठोंबरे

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. पवार आणि त्यांचा पक्ष जातीयवादी राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज ठाकरे यांच्या भाषणावर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर टीका-टीप्पणी होत आहे. यात रुपाली ठोंबरे यांनी उडी घेतली आहे.

राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांना मनसेतून राष्टवादीत आलेल्या रुपाली ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ईडीच्या नोटीसीनंतर फायरब्रँड नेत्याच फ्लाॅवर का झालं, असा माझ्यासारख्या कार्यकर्तीला प्रश्न पडला आहे. शरद पवार हे ईडीच्या कारवाईला न जुमानता उभे राहिले. त्यांनी ती कारवाई परतावून लावली, असं रूपाली ठोंबरे यांनी म्हटलंय. तसेच राज ठाकरेंचं भाषण भाजपने स्क्रिप्ट केलेलं यात शंकाच नाही, असंही ते म्हणालेत.

अमित शहा जे आज आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत, ते सुद्धा तडीपार आणि जेलमध्ये गेले होते. परंतु तरीही आज ते भारताचे गृहमंत्री आहेत. छगन भुजबळ तुरुंगात होते मात्र ते निर्दोष मुक्त झाले आहेत. भाजपला विकासाचा विषय नसल्याने जातीय तेढ वाढवण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर करून ते इतर पक्षांच्या नेत्यांना बोलायला भाग पाडत आहेत, असा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला आहे.

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर आणि शरद पवारांवर (Sharad Pawar) जे आरोप केले त्यात कोणतंही तथ्य नाही. राष्ट्रवादीत कोणताही जातीवाद नाही. हा पक्ष जातीपातीचं राजकारण करत नाही, हे पक्षाच्या नेत्यांवरून आणि आतापर्यंत जे मंत्री झालेत, त्यावरून दिसून येतं, असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या

महत्त्वाच्या बातम्या- 

पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबता थांबेना; आज ‘इतक्या’ रूपयांनी पेट्रोल महागलं 

‘…म्हणून मी राज ठाकरेंच्या घरी गेलो होतो’; गडकरींनी स्पष्टच सांगितलं 

Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी 

  ‘भाजपला राज ठाकरेंना सोबत घेणं परवडणारं नाही’; रामदास आठवलेंचा हल्लाबोल 

  “शरद पवार यांच्यावर मी Phd करतोय, इतक्या जास्त वयात ते…”