पुणे | राज्याच्या राजकारणात सध्या एक नाव चांगलच गाजतंय ते म्हणजे किरीट सोमय्या (Kirit Somaiya). काही दिवसांपूर्वीच सोमय्या (Sanjay Raut) राऊतांविरोधात तक्रार करण्यासाठी पुण्यात गेले.
त्यानंतर त्यांना महापालिकेच्या पायऱ्यांवर शिवसेनेकडून (Shivsena) धक्काबुक्की करण्यात आली. त्यात जखमी झालेल्या सोमय्यांना रुग्णलयातही दाखल करण्यात आलं. त्यानंतर हे प्रकरण पार दिल्लीपर्यंत गाजलं.
एवढा गदारोळ झाल्यानंतर आज सोमय्या पुन्हा पुण्यात गेले आहेत. ज्या पायऱ्यांवर सोमय्यांना धक्काबुक्की झाली त्याच पायऱ्यांवर त्यांचा सत्कार करण्याचा घाट भाजपने घातला होता. मात्र काँग्रेसकडून लगेच विरोधाची हाक देण्यात आली.
महापालिकेनेही सोमय्यांच्या सत्काराला परवानगी नाकारली. मात्र ज्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाली त्याच पायऱ्यावर भाजपने विरोध झुगारून सोमय्यांचा सत्कार केला आहे. आता या प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Thombre Patil) यांनी सोशल मिडीयावर लाईव्ह येऊन भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.
लबाड लांडगा ढोंग करतंय, जम्बो कोविडमध्ये दीपा एजन्सीचे लाड कोण पुरतोय, असा खोचक टोला रूपाली पाटील यांनी लगावला आहे.
पुणे पालिकेत येऊन तुम्ही नक्कीच भ्रष्टाचार बाहेर काढला पाहजे. पण भाजपच्या नेत्यांनी देखील जो भ्रष्टाचार केला आहे तो देखील तुम्ही बाहेर काढला पाहिजे तसेच भ्रष्टाचाराचे नाव घेऊन दिशाभूल करून नाही चालणार. त्याची पुराव्यानिशी माहिती द्यावी लागेल, असं आवाहन रूपाली पाटील यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“…तर मीही अण्णा हजारेंसोबत उपोषणाला बसेल”
“सरकार गेल्यापासून देवेंद्र फडणवीस फ्रस्ट्रेशनमध्ये”
“नाना तू उद्या सागरवर येऊन दाखव, पाहतो तू कसा परत जातो”
Jayprabha Studio: “आमचं चुकलं असेल तर मी राजकीय संन्यास घेईन”
येत्या 24 तासांत ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता