पुणे महाराष्ट्र

“आम्ही बाप दाखवतो नाहीतर श्राद्ध घालतो बरं”

पुणे | माझं नागरिकत्व कायद्याला समर्थन नाही तर खुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींना समर्थन देणाऱ्या मोर्चाच्या विरोधात हा मोर्चा असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. यानंतर मनसेनं भूमिका बदलली अशी टीका तसेच बातम्या माध्यमांमध्ये दिसत आहे. यावर मनसे नेत्या रूपाली ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिला आहे.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना या देशातून हाकललंच पाहिजे ही भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाअधिवेशनात मांडली आणि याबाबतीत सरकार जी कारवाई करेल त्याला आमचा पाठिंबा असेल अशी भूमिका त्यांनी मांडली. याबाबत ‘मनसेचा युटर्न’ अशी नाहक मांडणी करणाऱ्या माध्यमांसाठी ही चित्रफीत, असं म्हणत रूपाली ठोंबरे यांनी राज ठाकरेंचा मनसेच्या अधिवेशनातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आम्ही भूमिका बदलत नसतो हो… जे बोलतो थेट आणि ठासून बोलतो. आता चुकीच्या बातम्या आल्या तर स्पष्टीकरण द्यावंच लागतं, असंही रूपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मनसेचा मोर्चा हा सीएएच्या समर्थनार्थ नाही. तर घुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींना समर्थन देणाऱ्या मोर्चाच्या विरोधात हा मोर्चा आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-अमित शहा यांच्या सांगण्यावरून प्रशांत किशोर यांना पक्षात घेतलं- नीतीश कुमार

-स्टँडअप काॅमेडियन कुणाल कामरावर कारवाई

-महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांचं भाजपच्या टीकेला सणसणीत प्रत्युत्तर

-पुणे-बंगळूरू महामार्गावर टोलनाक्याजवळ पोलीस आणि अट्टल गुन्हेगारांमध्ये चकमकीचा थरार

-“जोपर्यंत मी जीवंत आहे तोपर्यंत या देशात राहणार”