रुपयात घसरण झाली अन् सोन्याचे दर वधारले, वाचा आजचे दर

नवी दिल्ली | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कौल आहे. भारतातील लोकांला सोन्याच्या असलेल्या चाहतीमुळे भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने घट होताना पाहायला मिळत होती. सोन्याबरोबरंच चांदीच्या दरात देखील घट पाहायला मिळत होती. मात्र, आता पुन्हा या दरात वाढ अनुभवायला मिळत आहे.

भारतात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुपयाच्या दरात घसरण अनुभवायला मिळत आहे. यामुळे सोन्याच्या दरात फार मोठी वाढ होत आहे. आज सोन्याच्या दरात तब्बल 97  रुपयांची वाढ झाली आहे.

काल एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याचा बाजार 46 हजार 160 रुपये प्रती तोळ्यावर बंद झाला होता. आज हाच दर  46 हजार 257 रुपये प्रती तोळ्यावर बंद झाला आहे. अशाप्रकारे आज सोन्याच्या दरात 97 रुपयांची वाढ झाली आहे.

आज चांदीच्या दरात मात्र क्षुल्लक घट अनुभवायला मिळाली आहे. काल एमसीएक्सवर प्रती किलो चांदीचा दर 66 हजार 528 रुपये प्रती किलो होता. आज हाच दर 66 हजार 253 रुपये प्रती किलोवर बंद झाला आहे.

28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव हा 67 हजार 500 इतका होता, तो आज 66 हजार 253 रुपये इतका झाला आहे. म्हणजेच गेल्या एका महिन्यात चांदीचे भाव चांगलेच घसरल्याचं पहायला मिळत आहे. 28 फेब्रुवारीचे भाव आणि आजचे भाव यांचा विचार करता चांदीच्या भावात तब्बल 1247 रुपयांची घसरण झाल्याचं दिसून येत आहे.

मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांश वेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातो.

या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

महत्वाच्या बातम्या – 

चक्क रस्त्यावर रंगली WWE! चिमुरड्यांच्या हाणामरीचा हा व्हिडीओ नक्की बघा, तुम्हीही पोट धरून हसाल

संतापलेल्या द्रविडचा अवतार पाहून विराटही हैराण, गाडीच्या काचा फोडल्या अन्…; पाहा व्हिडीओ

‘बिग बॉस’ फेम ‘या’ अभिनेत्रीनं कौटुंबिक वादातून केला आत्महत्येचा प्रयत्न

तरुणावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला! हलक्या काळजाच्या लोकांनी…

जमीन खोदताना आवाज आला अन् शेतकरी मालामाल झाला; वाचा नेमकं काय आहे प्रकरण?