“PoK आपल्या बापाचंय, भागवतांनी तिथे संघाची शाखा सुरू करावी”

मुंबई | रशिया युक्रेनमध्ये घुसू शकतो तर पाक व्याप्त काश्मीर तर आपल्या बापाचा आहे. तिसऱ्या टप्प्यात पाकिस्तानवर हल्ला करा. यावेळी मोहन भागवत यांनी स्वत: टँकमध्ये बसून जावं. भागवत यांचा टँक जिथून जाईल त्या जागेची सफाई करण्याचं काम प्रवीण तोगडीया करेल, असं आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी म्हटलंय.

पाक व्याप्त काश्मीरवर ताबा मिळवावा. तिथं मोहन भागवत यांनी संघाची शाखा सुरु करावी. स्वयंसेवक म्हणून तिथं प्रवीण तोगडीया नमस्ते सदा वस्तले म्हणायला येईल, असंही ते म्हणालेत.

भाजपाच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या केंद्र सरकारला आदेश द्या. जर आदेश देत नसाल तर तुम्ही स्वत: काश्मीरच्या खोऱ्यामधील गावात एक रात्र राहाण्यासाठी जा, असं त्यांनी सांगितलं.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये संघाची शाखा सुरु करण्यासाठी जा, मी दोन्हीसाठी तुमच्यासोबत असेल, असं प्रवीण तोगडीया म्हणालेत.

मोहन भागवत यांनी 15 वर्षांमध्ये अखंड भारत होईल असं म्हटलंय. मी त्यांच्या वक्तव्याचं स्वागत आणि समर्थन करतो. मोहन भागवत स्वत:च्या डोळ्यांनी अखंड भारत साकारताना पाहतील. पण त्यांना मी आठवण करुन देऊ इच्छितो की सत्तेत नसतो तेव्हा वचन द्यायचं असतं सत्तेत असतो तेव्हा करुन दाखवायचं असतं. त्यामुळे वचन देण्याचं तुमचं काम पूर्ण झालंय, असं प्रवीण तोगडीया

आता तुमच्या स्वयंसेवकांचं सरकार आहे. त्यांच्याकडे 15 लाखांचं सैन्य आहे तर आता करुन दाखवण्याची वेळ आली, असंही प्रवीण तोगडीया म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यातील ‘या’ भागांना अवकाळी पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज 

“माझ्या सर्व मित्रांना माझ्यापेक्षा जास्त माझी आईच आवडते” 

“…आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरू आहे” 

गुणरत्न सदावर्तेंबाबत सरकारी वकीलांचा मोठा खुलासा! 

‘मी मोदींना मारु शकतो’ म्हणणाऱ्या नाना पटोलेंच्या अडचणीत वाढ!