नवी दिल्ली | मागील दोन महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन (Russia-Ukrain War) युक्रेनने रशियाला दिली ‘ही’ मोठी ऑफर, झेलेंस्की म्हणाले… यांच्यात युद्ध सुरू आहे. रशियाने आक्रमक हल्ले करत युक्रेनच्या अनेक शहरांवर कब्जा मिळवला. त्यानंतर आता दोन्ही देशात वाटाघाटी सुरू आहेत.
युक्रेनने फरारी असलेल्या आणि रशियनला समर्थन देणारे राजकारणी व्हिक्टर मेदवेदचुक यांना अटक केल्याचा दावा केला आहे. युक्रेनमध्ये ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे रशियाला मोठा धक्का बसला आहे.
युक्रेनची सुरक्षा एजन्सी एसबीयूने मेदवेदचुक यांना अटक केलेला आणि युक्रेनियन लष्करी गणवेशात पोशाख केलेला फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आता युक्रेनचे नागरिक सरकारवर खुश असल्याचं पहायला मिळत आहे.
देशद्रोहाच्या संशयावरून त्यांना राजधानी कीवमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. परंतु 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर ते पळून गेले होते. त्यानंतर युक्रेनने त्यांना पकडलं.
मंगळवारी रात्री युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांना व्हिडिओ संदेशाद्वारे ऑफर दिली. मेदवेदचुकच्या बदल्यात त्यांनी युक्रेनच्या मुले आणि मुलींना सोडण्याचं आवाहन केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्यावर महिलेचे गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
Aryan khan : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीची मोठी कारवाई!
बेपत्ता ‘सोमय्या’ मुंबईत दाखल; कोर्टाकडून दिलासा मिळताच शिवसेनेवर बरसले
शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणात धक्कादायक माहिती समोर!
काय सांगता! रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडणार?