नवी दिल्ली | जग सध्या अनेक मोठ्या समस्यांच्या विळख्यात अडकलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनवरील हल्ल्याची (Russia-Ukrain War) धार कमी करण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही.
गेल्या महिनाभरापासून युक्रेनच्या रस्त्यांवर रक्ताचा सडा पडत आहे. मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक देखील मृत्युमुखी पडत आहेत. अशातच ब्रिटनच्या दाव्यानं सर्वांना काळजीत टाकलं आहे.
युद्धभूमीवरून अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. रशियाच्या सैनिकांना युक्रेनच्या नागरिकांनी झुंजवल्याचा व्हिडीओ देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
आता असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला जो व्हिडीओ पाहून सर्वजण फक्त चमत्कारच झालाय असं म्हणत आहेत. युद्धभूमिवरील सैनिकाचा हा व्हिडीओ आहे.
रशियन सैनिकांनी युक्रेनच्या सैनिकाला गोळी मारली, ती गोळी सैनिकाच्या शरीरातून आरपार गेली. पण चमत्कार म्हणावं की काय त्या सैनिकाला काहीच झालं नाही.
दोन युक्रेनी सैनिक आपापसात बोलताना या व्हिडीओत दिसत आहेत. एकजण त्याच्या खिशातून मोबाईल बाहेर काढतो तर त्यात गोळी घुसलेली असते.
रशियाच्या सैनिकानं मारलेली गोळी ही त्याच्या शरीराच्या आरपार गेली असती पण त्याच्याकडील स्मार्टफोननं कमाल केली. नशीब बलवत्तर म्हणून सैनिक वाचला आहे.
दरम्यान, रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या सैनिकांसह सामान्य नागरिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पण अशातच या सैनिकाचा व्हिडीओ सर्वांना दिलासा देत आहे.
पाहा व्हिडीओ –
महत्त्वाच्या बातम्या –
चेहऱ्यावर स्मित हास्य अन् डोळ्यात पाणी; हवाई सुंदरीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल
“दादागिरी केली असती तर 35 वर्षे राजकारणात टिकलो नसतो”
मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ
“देशातील चित्र बदलेल, इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता हे विसरू नका”
…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी