नवी दिल्ली | जग सध्या एकाच वेळी दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर लढत आहे. रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukrain War) आणि कोरोना (Corona) या दोन्हींचा परिणाम जगावर होत आहे.
रशिया-युक्रेन युद्धाला सुरू होऊन आता महिना होत आला असला तरी युद्ध थांबवण्यात कोणत्याही देशाला यश आलेलं नाही. दिवसेंदिवस हे युद्ध अधिक भयानक रूप घेत आहे.
मोठ्या प्रमाणात कीव शहराजवळ प्रेतांचा खच पडल्याचं आता समोर आलं आहे. रशियन सैनिकांनी युक्रेनच्या सैन्यासह सामान्य नागरिकांना देखील लक्ष्य केलं आहे.
युक्रेनची राजधानी कीव जवळील बाह बुका शहरात तब्बल 300 नागरिकांच्या प्रेतांना एकाच कबरीत दफन करण्यात आल्याचं तेथील महापौरांनी सांगितलं आहे.
महापौर अनातोफा फेझरूफ यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. रशियन सैन्यानं बाह बुका शहरावर ताबा मिळवल्याचं अनातोफा म्हणाले आहेत.
रशियन सैनिकांनी मारलेल्या तब्बल 300 हून अधिक लोकांना एकाच कबरीत दफन करण्यात आलं आहे. बुका शहरात मोठ्या प्रमाणात नासधुस झाली आहे.
रस्त्यावर देखील मृतदेहांचा खच पडला आहे. ज्यांना दफन करण्यात आलं आहे त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूस गोळ्या मारण्यात आल्या आहेत, असं अनोतोफा म्हणाले आहेत.
दरम्यान, रशियन सैन्याला प्रतिकार करण्यासाठी आता युक्रेनच्या सैनिकांच्या अधिक तुकड्या बाह बुका शहरात दाखल होत असल्याचंही अनातोला म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर; पहिल्याच दिवशी मिळवा ‘इतक्या’ हजारांचा बंपर डिस्काऊंट
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“पैसे जपून खर्च करा, चिकन खरेदी करायला गेलात तरी भाजप ईडीला कळवेल”
लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आली समोर, रेल्वेनं घेतला मोठा निर्णय
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज