Russia Ukraine War | रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात, धक्कादायक व्हिडीओ आला समोर

नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन यांच्या संबंध (Russia Ukraine Crisis) आता अधिकच चिघळू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून ताणला गेलेला या दोन दिशांमधील मुद्दा आता युद्धाचे ढग अधिक गडद करतो आहे. गुरुवारी वेगवेगळ्या जागतिक वृत्तसंस्थांनी रशियानं युक्रेनवर हल्ला चढवला असल्याचं म्हटलंय.

युक्रेनच्या अनेक शहरांत स्फोट झाला असल्याचं वृत्त हाती येत आहे. ओडेसा या ठिकाणी दोन महाशक्तिशाली स्फोट झाल्याचं सांगितलं जातंय. तर युक्रेनची राजधानी किवमध्येही दोन स्फोट झाले आहे. सीएनएननं याबाबतचं वृत्त दिलंय.

क्रामटोरस्क, बर्डियास्क आणि निकोलन शहरांत स्फोट झालं असल्याचं सांगितलं जातंय. युक्रेनवर मिसाईन्सनं हल्ला करण्यात आला आहे. किव, खारकीसह चार शहरांवर मिसाईलनं हल्ला केला आहे.

शियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्मादिर पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली होती. त्यानंतर आता युक्रेनमध्ये मिलिट्री ऑपरेशन्स सुरु करण्यात आली असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मारियुपोल येथे रात्रीच्या सुमारास स्फोट झाल्यावर आकाशात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसून येत आहेत. मात्र, हा गोळीबारामुळे झाला आहे की स्फोट झाल्याने झाला आहे हे अद्याप स्पष्ट नाहीये.

संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुतारेस यांनी वाल्मादिर पुतिन यांना युद्धाची भूमिका मागे घेण्यातं आवाहन केलंय. आपल्या सैनिकांना मिलिट्री ऑपरेशन्स करण्यापासून रोखण्याचं आव्हान यूएनकडून करण्यात आलं आहे. आपल्या सैनिकांना थांबवा आणि शांती प्रस्थापित करा, असं यूएनच्या महासचिवांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

रशियाच्या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांना पुतिन यांचा गंभीर इशारा, म्हणाले… 

मोठी बातमी! युक्रेनमध्ये सैन्य कारवाई करण्याची पुतिन यांची घोषणा 

सरकारची भन्नाट योजना; एकाचवेळी मिळतील 10 लाख 

“येत्या काही दिवसांत मोठा खुलासा करणार”, फडणवीसांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ 

माजिद मेमन यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले “नवाब मलिक यांना…”