नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine war) या दोन्ही देशात आता घनघोर युद्ध सुरू आहे. दोन्ही राष्ट्र आपापल्या ताकदीने लढत आहेत. अशातच आता युद्धाच्या 10 व्या दिवशी रशियाकडून प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
रशियाचे पंतप्रधान पुतीन यांनी या युद्धावर समोर येत आपली भूमिका मांडली आहे. पुतीन यांनी युद्धाच्या दहाव्या दिवशी ही महत्त्वपूर्ण मागणी केली आहे.
युक्रेनवर हल्ला करण्याचा निर्णय कठीण होता. पण युक्रेनच्या जवळपास सर्वच लष्करी छावण्या उद्ध्वस्त करण्यात आल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे.
डोनबॉसचा प्रश्न आम्ही शांततेत सोडवण्याचा प्रयत्न केला होता. पण युक्रेनने शांततेचा भंग केलाय. रशियावर आज लावण्यात आलेले प्रतिबंध हे युद्धासाठी आव्हान दिल्यासारखंच होतं, असंही पुतीन यावेळी म्हणाले आहेत.
युक्रेनवर नो फ्लाय झोन लावणं हे युद्धाचं आव्हान देण्यासारखंच होतं. त्यानंतर ब्रिटनच्या मंत्र्याच्या वक्तव्यानंतर आम्ही रशियन सैन्याला हायअलर्टवर ठेवलं असंही पुतीन यांनी सांगितलं आहे.
युक्रेनमधील डोनेट्स्क प्रांत रशियाकडे द्या, अशी मागणी व्लादिमीर पुतीन यांनी केली आहे. डोनेट्स्क प्रांत रशियाकडे सोपवल्यानंतर युद्ध थांबवू, असंही ते यावेळी म्हणाले.
आपण युक्रेनसोबत चर्चेसाठी तयार त्यासाठी त्यांनी 3 अटी देखील ठेवल्या आहेत. युक्रेन हा तटस्थ आणि गैर-अणुऊर्जा देश असेल, ही पहिली अट आहे. क्रिमिया हा रशियाचा भाग आहे, हे युक्रेनने मान्य करावं, अशी दुसरी अट ठेवण्यात आलीये.
दरम्यान, युक्रेनने पूर्व युक्रेनचा बंडखोर भागांचं स्वातंत्र्य मान्य करावं, अशी तिसरी अट देखील रशियाने युक्रेनसमोर ठेवली आहे. यावर आता युक्रेन काय निर्णय घेणार हे पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
हाॅटेलच्या रूममध्ये नेमकं काय घडलं?, शेन वाॅर्नच्या मॅनेजरचा मोठा खुलासा
सरकार म्हणजे अजित पवार ना…?, अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी; पाहा व्हिडीओ
“काही दिवसांपूर्वी शरद पवार कारण नसताना पुणे मेट्रोतून फिरुन आले”
व्लादिमीर पुतिन यांना घरचा आहेर; आता रशियन नागरिकांनी उचललं मोठं पाऊल!
“महाराष्ट्र संकटात असताना घरात बसणं मला जमलं नाही”