Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात हॅकर्सचा धुमाकूळ; आता पुतिनचं टेन्शन वाढलं

नवी दिल्ली | मागील 25 दिवसांपासून सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धात (Russia Ukraine War) रशियन फौजा आक्रमक कारवाई करत आहे. युक्रेनच्या बहुतांश भागावर आता रशियाने कब्जा मिळवला आहे.

असं असलं तरी आता रशियाला एक डोकेदुखी मागील काही दिवसांपासून सतावत असल्याचं समोर आलं आहे. मागील काही दिवसांपासून एक प्रसिद्ध हॅकर्स गृप रशियाच्या संकेतस्थळांवर वारंवार सायबर हल्ले करत असल्याचं पहायला मिळतंय.

हॅकर्सने रशियन सरकारी एजन्सींवर सायबर हल्ले करून त्यांच्या नाकी नऊ आणल्याचं पहायला मिळतंय. रशियाच्या वेबसाईट्स आणि सरकारी टीव्ही चॅनल देखील हॅक करण्यात आलं होतं.

जर युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काहीही केले नाही तर आम्ही रशियावर सायबर हल्ले तीव्र करू, असा थेट इशारा हॅकर्सने दिला आहे. काही अॅटोनाॅमस सायबर हॅकर्स हे हल्ले करत असल्याचं सांगण्यात येतंय.

सध्याच्या आधुनिक युगात इंटरनेटला खूपच महत्त्व आहे. त्यामुळे आगामी युद्ध ही तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय होणं हे अशक्यच आहे. त्यामुळे आता एक प्रकारे हॅकर्स रशियावर दबावतंत्राचं काम करत असल्याचं दिसतंय.

दरम्यान, लाईव्ह टीव्ही हॅक करणं म्हणजे खूप अवघड गोष्ट समजली जाते. त्यामुळे या हॅकर्सशी पंगा रशियाला किती महागात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

इंदापूरच्या राजकारणात मोठी खळबळ; राष्ट्रवादीचा हर्षवर्धन पाटलांना दे धक्का!

 दाद्या मारायलाय…! शंकरपाळ्यानंतर आता महाराष्ट्राला वेड लावणारं बारकाल्या पोरांचं भांडण व्हायरल

NCC उमेदवारांसाठी खुशखबर! पोलीस भरतीसाठी ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“कोण कोणासोबत झोपतो हे…”, सत्ताधाऱ्यांवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली

Health Tips For Summer: कडक उन्हाळ्यात ‘हे’ 7 पदार्थ नक्की खा… शरीराला आराम मिळेल