Russia-Ukraine War: युद्धात मोठी घडामोड; ‘या’ शहरातून रशियन सैन्य अचानक माघारी फिरलं

नवी दिल्ली | मागील 38 दिवसांपासून सुरू असलेलं रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) आता निर्णायक टप्प्यावर आल्याचं पहायला मिळत आहे. रशियाने आतापर्यंत युक्रेनविरूद्ध आक्रमक भूमिका कायम ठेवल्याचं पहायला मिळतंय.

रशियन सैन्याने युक्रेनच्या अनेक महत्त्वाच्या शहरावर हल्ला चढवत अनेक ठिकाणं उद्धवस्त केली. अशातच दोन्ही देशात आता चर्चेला देखील सुरूवात झाली आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही.

रशियाची आर्थिक कोंडी केली जात असताना देखील रशिया युद्धातून माघार घेण्यास तयार नाही. याउलट रशियाचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे आता युद्धात भारत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं दिसतंय.

अशातच आता युक्रेनमधून मोठी बातमी समोर आली आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार रशियन सैनिक चेर्नोबीलमधून माघारी परतत आहेत. रशियन सैन्याने अचानक सैन्य मागे घेतल्याने आता चर्चांना उधाण आलं आहे.

ज्या शहरात रशियाने हल्ला केला होता. त्याठिकाणी अनुभट्ट्या होत्या, असं मीडिया रिपोर्टच्या हवाल्यानुसार समोर आलं होतं. त्यामुळे आता सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, युक्रेन आणि रशियामध्ये करार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, यात नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आली नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

“राष्ट्रवादीवर भरोसा ठेऊ नका, मातोश्रीवर कॅमेरे लागतील…”

Gold Silver Rate: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर

“मी पुन्हा येईन म्हणणंही एप्रिल फूलच”

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी

“शिवसेना-राष्ट्रवादीत मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाच्या अदलाबदलीची शक्यता”