नवी दिल्ली | रशिया युक्रेन युद्धानं (Russia Ukraine War) संपूर्ण जगावर गंभीर परिणाम केला आहे. या युद्धामुळे अनेकांचं मोठं नुकसान झाल्यचं पहायला मिळत आहे.
एक महिना उलटून गेला अद्यापही रशिया युक्रेन युद्ध सुरु आहे. त्यामुळे दोन्ही देशातील नागरिक चिंतेत आहेत.
रशियाकडून युक्रेनवर बॉम्बहल्ले, हवाईहल्ले तसेच क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. या हल्ल्यांत युक्रेनमध्ये मोठी जीवीत तसेच वित्तहानी झालेली आहे.
रशिया युक्रेन या दोन्ही देशांतील युद्ध थांबावं अशी प्रार्थना सध्या सगळेजन करत आहेत. त्यामुळे आता हे युद्ध कधी थांबतं हे महत्त्वाचं ठरणार आहे.
तुर्कीच्या इस्तांबुल शहरात रशिया आणि युक्रेनच्या प्रतिनिधींमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा चर्चा पार पडली.
जर नाटो देशांनी युक्रेनला विमान आणि हवाई रक्षा साधणांचा पुरवठा केला तर रशियाकडूनही त्याच पद्धतीने उत्तर देण्यात येईल, असा इशारा रशियानं दिला आहे.
रशियाने म्हटलं आहे, ते युक्रेनवर आण्विक हत्यारांचा वापर करणार नाहीत. मात्र रशियाच्या अस्तित्वाला काही धोका असल्याचं जावणल्यास याचा वापर करण्यात येईल.
अशी स्थिती प्रस्तावित केली आहे ज्यामध्ये ते कोणत्याही युतीमध्ये सामील होणार नाहीत. तसंच त्यांच्या भूमीवर परदेशी सैन्याचं आयोजन करणार नाहीत, असं युक्रेनचं म्हणणं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022: देवदत्त पेडिक्कलचा कॅच वादाच्या भोवऱ्यात; अंपायरच्या निर्णयावर SRH नाराज; पाहा व्हिडीओ
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘येत्या 14 एप्रिलला…’
“आशिषजी जरा तोंड सांभाळून बोला, अन्यथा…”
Deltacron: चीनमुळे भारताला चौथ्या लाटेचा धोका?, ICMR ने दिला ‘हा’ गंभीर इशारा
काय सांगता! Russia-Ukrain युद्धादरम्यान अमेरिकेनं केली चक्क रशियाला मदत; झालं असं की…