नवी दिल्ली | रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) युद्धाचे परिणाम जगावर होताना दिसत आहेत. जागतिक स्तरावर महागाई वाढत असताना आता भारतात देखील महागाई नव्या स्तरावर आहे.
रशिया युक्रेनविरोधात अधिक आक्रमक होत असताना जगातील काही देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादायला सुरूवात केली आहे.
रशियाची आर्थिक कोंडी केली जात असताना देखील रशिया युद्धातून माघार घेण्यास तयार नाही. याउलट रशियाचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आले आहेत.
भारत-रशिया द्विपक्षीय संबंधामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि रशियाच्या आर्थिक कोंडीला काही प्रमाणात कमी करण्यासाठी हा भारत दौर असल्याचं म्हटलं जात आहे.
रशिया हा भारताला शस्त्रास्त्र आणि कच्चं तेल आयात करणार आहे. परिणामी रशियाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागणार आहे. सध्या भारत दौऱ्यावर असलेले परराष्ट्रमंत्री विविध बाजूंनी चाचपणी करत आहेत.
नव्या करप्रणालीनूसार भारत-रशिया व्यवहार होणार आहेत. रशियाचे रूबल भारतीय बॅंकेत जमा केले जातील त्यानंतर त्याचं भारतीय रूपयात रूपांतर करण्यात येणार आहे.
करप्रणालीबाबत रशियाचे अधिकारी लवकरच भारत दौरा करण्याची शक्यता आहे. भारताला सध्या रशियन कच्च तेल कमी किंमतीत मिळणार आहे.
दरम्यान, भारत-रशिया द्विपक्षीय संंबंध बळकट करण्यासाठी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दौरा महत्त्वाचा असल्याचं भारत सरकारनं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“ईडीचा वापर पाळलेल्या गुंडासारखा जर कोणी करत असेल तर…”
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय!
दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा
‘काहीही खाऊ नका, पिऊ नका’; झेलेंस्की यांनी अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना
“राऊतांनी कायमचंच मौन धारण केलं तर शिवसेनेचं भलं होईल”