Russia-Ukraine War: युक्रेनसोबत रशियाचं नेमकं भांडण काय?, वाचा सविस्तर

नवी दिल्ली | रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर (Russia-Ukraine) सैन्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पुतिन यांच्या या आदेशानंतर आता जगामध्ये चिंता पसरली आहे. जग एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे.

अमेरिका, यूके, फ्रान्स आणि जर्मनीसारख्या देशांचा समावेश असलेली नाटो ही संघटना युक्रेनला लष्करी पातळीवर मदत करायला तयार आहे. युक्रेननं त्या दिशेन पावलं उचलायला सुरूवात केल्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष वाढत गेला आहे. नाटो हे उत्तर अटलांटिक करार संघटनेचं ( North Atlantic Treaty Organisation) हे नाटोचं सक्षिप्त रूप आहे.

रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचं नेमकं कारण म्हणजे नाटो. युक्रेननं नाटोमध्ये जाण्यासाठी पावलं उचलायला सुरूवात केल्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष वाढत गेला आहे. रशियाला याच गोष्टीचा आक्षेप आहे.

युक्रेन हा नाटोचा सदस्य देश नाही. पण तो ‘भागीदार देश’ आहे. म्हणजेच भविष्यात युक्रेनला कधीतरी नाटोचा सदस्य होता येऊ शकतं. रशियाचा नेमका याच गोष्टीवर आक्षेप आहे. याची हमी रशियाला पाश्चात्य देशांकडून हवी आहे.

नाटो ही एक लष्करी संघटना असून 1949 मध्ये 12 देशांनी या संघटनेची स्थापना केली होती. कोणत्याही एका सदस्य देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास इतर जण मदतीला येतील, असा उद्देशानं नाटोची स्थापना झाली.

अमेरिकनं युक्रेनला नाटोचं सदस्यत्व घेण्यापासून रोखायला नकार दिला आहे. युक्रेन हा सार्वभौम देश आहे आणि स्वत:च्या सुरक्षेसाठी कोणासोबत भागीदारी करायची याचा निर्णय घ्यायला स्वातंत्र आहे, अशी भूमिका अमेरिकेनं घेतली आहे.

युक्रेनमध्ये रशियन वंशाच्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. रशियासोबत सामाजिक आणि सांस्कृतिक धागेदोरेही आहेत.

दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांना असं वाटतं की, पाश्चिमात्य देश हे रशियाला घेरण्याच्या उद्देशाने या देशांशी संबंध जोडत आहेत. त्यामुळे युक्रेन आणि रशियातील वाद आणखीनच चिघळला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

पावनखिंड चित्रपट पाहणाऱ्यांना ‘या’ ठिकाणी मिळणार मिसळवर बंपर डिस्काऊंट

रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका; ‘या’ गोष्टी महागणार 

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध; जगासाठी पुढील 48 तास महत्त्वाचे 

 मोठी बातमी! युक्रेनमध्ये सैन्य कारवाई करण्याची पुतिन यांची घोषणा

सरकारची भन्नाट योजना; एकाचवेळी मिळतील 10 लाख