रशिया-युक्रेन युद्ध! दोन महिन्यांचं युद्ध, देशांची बंदी तरीही रशिया भक्कम

नवी दिल्ली | भारताचं चलन असणारा रूपया हा अमेरिकन डाॅलरच्या तुलनेत दिवसेंदिवस घसरत चाललेला पाहायला मिळत आहे. अशात रशियाचं चलन मात्र सुधारलं आहे.

रशिया-युक्रेन युद्ध गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर ताबा मिळवण्याच्या आपल्या प्रयत्नांना आणखीन वाढवलं आहे.

रशियन सैन्य युक्रेनला उद्ध्वस्त करत असताना जागतिक स्तरावर रशियाला अनेक निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. अशात रशियासाठी एक चांगली माहिती समोर आली आहे.

रशियाचं चलन असलेलं रूबल हे अमेरिकन डाॅलरच्या तुलनेत आता सुधारलं आहे. अनेक निर्बंधांनंतरही रूबल तब्बल 11 टक्क्यांनी वधारलं आहे.

रशियानं अनेक देशांच्या निर्बंधानंतरही गॅस निर्यात करताना रूबल चलनात पैसे भरण्यास इतर देशांना सांगितलं आहे. परिणामी रूबलमध्ये वाढ होत आहे.

युद्ध सुरू होण्यापुर्वी रूबल अमेरिकन डाॅलरच्या तुलनेत 71.47 रूबल किंमतीवर होतं. युद्धादरम्यान मात्र एक डाॅलरच्या तुलनेत 39 रूबल ही किंमत झाली आहे.

दरम्यान, रूबल वधारत असल्यानं रशियाला या युद्धाचा जास्त प्रमाणात नुकसान झालेलं नाही. अशात भारतीय रूपयाची घसरण चिंतेचा विषय बनली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ‘मनी लाॅंड्रिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी होणार’; भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

 कोण होणार ‘IPL 2022’ चा बादशहा?, दोन संघ बाहेर पडताच आठ संघांमध्ये चुरस

 ‘किधर छुप्या है अमित ठाकरे…’; दिपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका

“ज्यांना घरातून बाहेर काढलं, त्यांच्यावर काय बोलू?, त्यांची लायकी नाही”

बाथरूममध्ये SEX करण्याची इच्छा जीवावर बेतली; अत्यंत धक्कादायक प्रकार समोर