“कोरोना काळात पुण्याला कोण पळून गेलं हे सगळ्यांना माहिती”

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकात जाधव यांचे निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक लागली असून जयश्री जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली आहे.

सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यासाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी या ठिकाणी तळ ठोकला आहे. आता कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रचारभेत बोलताना भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

राज्यातील जनता वेगळी आणि कोल्हापूरची जनता वेगळ्या विचारांची आहे हे विरोधकांनी लक्षात ठेवावं असं कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील म्हणाले. कोरोनाच्या संकटात कोल्हापुरात कोण होतं आणि पुण्याला कोण पळून गेलं हे सगळ्यांना माहीत आहे असा टोलाही त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. ते महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ बोलत होते.

कोल्हापूर शहरातून पहिल्यांदा एका महिलेला आमदार होण्याचा मान मिळाला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून युवक युवतींना क्रीडा, शैक्षणिक पातळीवर काम सुरू आहे. एक हजार स्टार्टअप निर्माण केले जाणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांसाठी कोल्हापूर महापालिकेच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं ते म्हणाले.

भाजपचे नेते वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करत आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कोल्हापूर शहराचा विकास करायचा असेल तर एका विचाराच्या लोकांनी एकत्र आले पाहिजे असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Corona: महाराष्ट्र कोरोनामुक्त होतोय! वाचा राज्याची आजची ताजी आकडेवारी

Amit Shah: “…तेव्हा मला राग येतो”, गृहमंत्री अमित शहांचा संसदेत खुलासा

“राज ठाकरेंंना माझी हात जोडून विनंती आहे की…”

कोरोनाच्या चौथ्या लाटेबद्दल अदर पुनावाला यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेच्या मुस्लीम कार्यकर्त्यांचे राजीनामे