नवी दिल्ली | वास्तविक केंद्र सरकारने मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी त्यावर आपापली मतं व्यक्त केली आहेत. काहींनी त्याबाबतचं मत व्यक्त करताना अकलेचे तारे तोडले आहेत, तर काहींची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.
सध्या मुलींसाठी लग्नाचे किमान वय 18 वर्षे आहे, जे या प्रस्तावानुसार 21 वर्षे करण्यात येणार आहे. जर कायदा झाला तर भारत अशा काही देशांपैकी एक असेल जिथे महिलांसाठी लग्नाचे वय 21 वर्षे आहे.
समाजवादी पक्षाचे खासदार शफीक उर रहमान यांच्यानंतर आता आणखी एक सपा खासदार एसटी हसन यांनीही केंद्राच्या या प्रस्तावावर आक्षेप नोंदवत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून 16-17 करण्यात यावं, असं एसटी हसन यांनी म्हटलं आहे. लग्नाला उशीर झाला तर त्या मुली अश्लील व्हिडीओ (पोर्नोग्राफी) पहात बसतील, घाणेरडे चित्रपट पाहतील आणि हे सगळं व्यर्थ आहे. त्यामुळे मुली वयात आल्यावर त्यांचं लग्न करायला हवं, असं त्यांनी म्हटलं आहे.
जर लग्न लवकर झालं तर त्या मुलीला लवकर मुलं होऊ शकतात, कारण प्रजननक्षमतेचे वय 15 ते 30 वर्षे आहे. अशा स्थितीत लग्नाचं वय वाढवू नये, असं ते म्हणालेत.
समाजवादी पक्षाचे खासदार शफीक उर रहमान वर्क यांनी या प्रस्तावाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. लग्नाचे वय वाढवल्याने मुली आणखी बिघडतील, असं त्यांनी म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित पाटलांच्या ‘बघून घेतो’च्या भाषेवर अजित पवार म्हणाले…
महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर; Omicron बाबत तज्ज्ञांचा धक्कादायक दावा
“शरद पवारसाहेब झुकून नमस्कार करतील असे पाय दिसत नाहीत”
‘बैलगाडा शर्यतीचं श्रेय कोणाचं?’; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला, म्हणाले…