“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातलं सक्षम नेतृत्व, त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत”

मुंबई | पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळास एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करण्यात आलं आहे. तसेच सरकारच्या कारभारावर टीका देखील करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे आणि त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. त्यांना राष्ट्रकार्याची तळमळ आहे. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहे, अशा शब्दांत सामनाच्या अग्रलेखातून मोदींचं कौतुक करण्यात आलंय.

मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच पण नोटबंदी आणि लॉकडाउन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार? असा सवाल करत शिवसेनेनं सरकारवर टीकास्त्र देखील सोडलं आहे.

दरम्यान, साठ वर्षात चुका झाल्या तशा मागच्या सहा वर्षातही झाल्या. गेल्या दोन महिन्यांत चुकीच्या पद्धतीने केलेले लॉकडाऊन आणि त्यानंतर स्थलांतरित मजुरांची ससेहोलपट ही फाळणीतील निर्वासितांचीच आठवण करून देणारी आहे. ही चूक कशी दुरुस्त करणार?, अशी विचारणा शिवसेनेनं केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘मी वरिष्ठ मंत्र्याच्या कामात लुडबुड करत नाही’; कॉल करणाऱ्या शेतकऱ्याला अजित पवारांचं उत्तर

-अक्षय बोऱ्हाडे-शेरकर वादाच्या कलाटणीनंतर मिटकरींची गरमागरम फेसबुक पोस्ट!

-मला सरकारची चिंता नाही… सरकार कुणी पाडू शकत नाही- उद्धव ठाकरे

-फक्त ‘या’ एका कारणामुळे अक्षय बोऱ्हाडे-सत्यशील शेरकर यांच्यातील वाद मिटला

-अखेर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द; असे दिले जाणार मार्क