Top news महाराष्ट्र मुंबई

…तर ते या राज्यात राहण्याच्या लायकीचे नाहीत, असंच म्हणावं लागेल- संजय राऊत

मुंबई | इतके निर्लज्ज लोक महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्राशीच बेईमानी करतात हे कसे सहन करायचे? मुंबई अर्ध्या देशाचे पोट भरते. देशाच्या तिजोरीस किमान 30 टक्के हातभार एकटी मुंबई लावते. आता हे जर येथील काही लोक नाकारत असतील तर ते या राज्यात राहण्याच्या लायकीचे नाहीत असेच म्हणावे लागेल, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र मुंबईहून गुजरातच्या गांधीनगरला हलवण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारनं घेतला आहे. राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या विषयावर सामनाच्या अग्रलेखातून कोरडे ओढण्यात आले आहेत.

गांधीनगरला हलविण्यात आलेल्या आर्थिक केंद्राबाबत तांत्रिकदृष्टय़ा गुजरातचे बरोबर असेलही, पण दिल्लीत मोदी सरकार असल्यामुळेच गुजरातला झुकते माप मिळत आहे. मुंबईतल्या अनेक वित्तीय संस्था, उद्योग-व्यापार गुजरातला हलवून महाराष्ट्राचे मोठे नुकसान केलेच आहे, असं अग्रलेखात म्हटलंय.

दरम्यान, विरोधी पक्षात असताना शिवसेनेने यावर आवाज उठवला. आता हे काम श्री. फडणवीस व त्यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाने केले पाहिजे. फडणवीस हे महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांची बाजू धरून बोलत असतील तर हा असला विरोधी पक्ष कुचकामी आहे व महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्यांना जनताच मुंबईच्या अरबी समुद्रात बुडवेल, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

-त्यांनी तयार केलेलं ‘सोशल’ औषध आता त्यांनाच ‘कडू’ लागतायत; राष्ट्रवादीचा व्यंगचित्रातून भाजपवर निशाना

-लॉकडाउनमध्ये थोडा दिलासा; ‘या’ ठिकाणी बससेवा होणार सुरू

-डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलाची तहसीलदाराला मारहाण, हे आहे खरं कारण…

-पुणे शहर आणि जिल्ह्यात दारुची दुकाने सुरु होणार का?; आला महत्त्वाचा निर्णय

-जागा चार, नावं सात… ‘या’ नावांपैकी भाजप नेमकी कुणाला देणार संधी?