उदयनराजेंचा पराभव झाल्यानंतर मराठा समाजात अस्वस्थता आणि नाराजी- संभाजीराजे भोसले

मुंबई |  साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा पराभव झाल्यानंतर मराठाच नाही तर बहुजन समाजामध्ये अस्वस्थता आणि नाराजी असल्याचं मत राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे. उदयनराजेंच्या पराभवाचं दु:ख फक्त मराठा समाजालाच नाही तर इतर समाजाला देखील क्लेशकारक होतं, असंही ते म्हणाले.

संभाजीराजे भोसले हे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र मी भाजपवर नाराज नसल्याचं स्पष्ट करत मी परखड बोलणारा आणि स्पष्टवक्ता माणूस आहे. माझी भूमिका स्पष्ट असते. आणि आजच नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून मी माझ्या मतांवर ठाम आणि स्पष्ट असतो, असंही ते म्हणाले.

मी फक्त मराठा आहे म्हणून भाजपने मला खासदारकी दिली नाही. मी शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांचं कार्य जोमाने पुढे चालवतो आहे. त्यासाठी मी महाराष्ट्र पिंजून काढलाय. या सगळ्या माझ्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे त्यांनी मला नुसती खासदारकी दिली नाही तर मला राष्ट्रपती नियुक्त खासदार केलं असल्याचंही संभाजीराजेंनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, माझ्यासाठी माझं घराणं महत्त्वाचं आहे. माझी लोक महत्त्वाची आहेत. त्यांच्यासाठी अखेरपर्यंत सेवा करत राहिन आणि तिच माझी प्रायोरिटी राहिल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-