मुंबई | सुधारित नागरिकत्व कायद्यावरून मुख्यमंत्र्यावर टीका करताना भाजप नेते आशिष शेलार यांनी कायदा लागू न करणं म्हणजे तुझ्या बापाचं राज्य आहे का, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली यावर बाप बाप होता है, असा टोला शिवसेना नेते सचिन अहिर यांनी आशिष शेलार यांना लगावला आहे.
सचिन अहिर यांनी आशिष शेलार यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाकून नमस्कार करतानाचा फोटो ट्विटरवर शेअर करत बाप बाप होता है, असं कॅप्शन दिलं. अहिरांनी आपल्या ट्विटमध्ये आशिष शेलारांना टॅग केलं आहे.
मी व्यक्तीगत कुणाचा उल्लेख केलेला नाही. मात्र तरीही जर कुणाची भावना दुखावली गेली असेल तर मी माफी मागतो, असं स्पष्टीकरण भाजप नेते आशिष शेलार यांनी काल दिलं.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा मान आपण सर्वांनी ठेवला पाहिजे. मग पक्षातले नेते असो वा विरोधी पक्षातले नेते…. आशिष शेलार यांनी शब्द जरा जपून वापरले पाहिजेत, असा सल्ला खासदार सुप्रिया सुळेंनी शेलारांना दिला होता.
Baap baap hota hai …@ShelarAshish @PTI_News pic.twitter.com/01CY2gxFOT
— Sachin Ahir (@AhirsachinAhir) February 3, 2020
महत्वाच्या बातम्या-
-मुंबईतील वर्सोवा भागात मनसे कार्यकर्त्यांनी बांगलादेशी घुसखोरांना दिला इशारा
-सहकारमंत्र्यांच्या रॅलीत सोनं आणि पाकीट चोरी करणाऱ्या टोळीला कराडमध्ये अटक
-राजधानी काबीज करण्यासाठी भाजपची टीम दिल्लीदरबारी