महाराष्ट्र मुंबई

शरद पवार कुठं भेटले तर हात जोडून माफी मागेल आणि ते मला….- सचिन अहिर

मुंबई : राष्ट्रवादीचे मुंबई शहराध्यक्ष सचिन अहिर यांनी गुरूवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्याच पार्श्वभूमीवर ते आज माध्यमांशी बोलत होते.

शरद पवार साहेब कुठं भेटले तर हात जोडून मी त्यांची माफी मागेल आणि तेही मला हसून माफ करतील, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित शिवसेना नेते सचिन अहिर यांनी दिली आहे. मी जरी राष्ट्रवादी पक्ष सोडला असला तरी पवार साहेब कायम माझ्या हृदयात असतील, असं ते म्हणाले.

राष्ट्रवादी पक्षांतर्गत कोणतीही अंतर्गत धुसफुस नाही. आजही शरद पवार साहेबांंचाच शब्द अंतिम आहे.
शरद पवार माझ्यासाठी राजकारणातील आदर्श आहेत, असं अहिर म्हणाले.

धर्मनिरपेक्षतेनंतर हिंदुत्ववादाची विचारधारा स्वीकारणे काहीसं कठीण जाईल पण येत्या काळात मी त्याच्यावर काम करेन, असंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आणि नेत्यांच्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर मुंबईतून निवडून येणारा मी एकमेव आमदार होतो. काही लोक भविष्यवाणी करतात, पण त्यांनी स्वतःच्या मतदारसंघांची स्थिती पहावी, असा पलटवार त्यांनी केला.

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढावी, अशी इच्छाही अहिर यांनी बोलून दाखवली.

महत्वाच्या बातम्या-

‘पार्थ इज बॅक’! विधानसभेसाठी ‘ही’ महत्वाची जबाबदारी उचलायला सज्ज

-पवार घराण्याला पराभव दाखवणाऱ्या शिवसेना खासदाराचं मोदींकडून कौतुक!

-“राष्ट्रवादी शरद पवारांपुरती मर्यादित, तर अध्यक्ष नसलेल्या काँग्रेसची स्थिती हास्यास्पद”

-राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार; ‘हा’ नेता भाजपच्या वाटेवर???

-“खासदार आझम खान यांचे शीर कापून संसदेवर लटकवा”

IMPIMP