महाराष्ट्र मुंबई

शरद पवार माझ्या ह्रदयात असतील तर उद्धव आणि आदित्य यांचं बळ अंगात असेल- सचिन अहिर

मुंबई |  मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा भगवा हातात घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आगामी काळातील त्यांची राजकारणाची दिशा स्पष्ट केली.

मी राष्ट्रवादी तोडण्याचं काम कधी करणार नाही. तर शिवसेना वाढवण्याचं काम करेल. राष्ट्रवादी सोडली असली तरी शरद पवार साहेब माझ्या ह्र्दयात असतील तर उद्धव आणि आदित्य यांचं बळ अंगात असेल, अशा भावना सचिन अहिर यांनी व्यक्त केल्या.

उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद माझ्यासोबत असतील. माझ्या सोबत माझे कार्यकर्ते मोठ्या जिद्दीने काम करतील. तसेच माझे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्यास उत्सुक आहेत, असंही अहिर म्हणाले.

शरद पवार यांना गेल्या आठवड्यात मी भेटलो होतो. माझ्या मतदारसंघाची माहिती त्यावेळी मी त्यांना दिली. मात्र शिवसेनाप्रवेशाचा निर्णय मी त्यांना सांगू शकलो नाही, असं अहिर यांनी यावेळी सांगितलं.

राष्ट्रवादीने अहिर यांना 2009 मध्ये मंत्रीपदाची संधी दिली होती. तर 2014 च्या निवडणुकीत अहिरांचा वरळी मतदारसंघातून शिवसेनेच्या सुनिल शिंदेंनी पराभव केला होता. तेव्हापासून ते मुंबई शहराचं राष्ट्रवादी अध्यक्षपद सांभाळत होते.

दरम्यान, पवार साहेबांची मला साथ मिळाली… ती न तुटणारी आहे. राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात. ते योग्य की अयोग्य हे काळ ठरवत असतो, असंही ते म्हणाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र अहिरांवर जोरदार टीकास्त्र सोडत त्यांना ‘गद्दार’ म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मी काटे मोडत नाही तर, फक्त घड्याळाला चावी देतो- उद्धव ठाकरे

-सचिन अहिरांनी ‘राम राम’ करताच राष्ट्रवादीकडून ‘या’ नेत्याची मुंबई अध्यक्षपदी निवड!

-शिवसेनेने पडणारा नेता नेला- नवाब मलिक

-राष्ट्रवादीनंतर काँग्रेसला धक्का; हा आमदार भाजपच्या गळाला??

-भाजप प्रवेशाला नाही म्हटले म्हणूनच मुश्रीफांच्या घरावर धाड??

IMPIMP