फडणवीसजी, तुम्ही केंद्राला महाराष्ट्राचे 40 हजार कोटी रुपये दिलेत का???

मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणं ही एक चाल होती. फडणवीस हे 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवले, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केला आहे. त्यावर हेगडेंच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राचे 40 हजार कोटी रुपये केंद्राला परत दिले का?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

मुख्यमंत्र्यांकडे जवळपास 40 हजार कोटी रुपयांची केंद्राचा निधी होता. जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेत आले असते, तर त्यांनी या 40 हजार कोटी रुपयांचा दुरुपयोग केला असता. त्यामुळेच फडणवीसांनी 80 तास मुख्यमंत्रिपदावर येऊन हे नाटक केलं आणि 15 तासात त्यांनी केंद्राचा हा निधी परत पाठवला, असं हेगडे यांनी म्हटलं आहे. त्यावर फडणवीसांनी याचं उत्तर दिलं पाहिजे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे मी केंद्राला एकही पैसा परत केलेला नाही. राज्याच्या अर्थ विभागाने हे सत्य समोरं आणावं, असं म्हणत फडणवीसांनी हेगडेंचा दावा फेटाळून लावला आहे.

दरम्यान, हेगडेंचे आरोप खरे असतील तर पंतप्रधान मोदींना राजीनामा द्यावा लागेल, असं राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-