मनोरंजन

दिमाग मै भुसा… पाहा महागुरु सचिन पिळगावकर यांचं नवीन गाणं

अभिनेते सचिन पिळगावर यांचं ‘आमची मुंबई’ हे गाणं प्रचंड ट्रोल झालं होतं. त्यानंतर आता त्यांचं ‘दिमाग मै भुसा’ है नवीन गाणं आलं आहे. यूट्यूबवर हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

सचिन पिळगावकर यांनी हे गाणं गायलं आहे. आमची मुंबई ज्याप्रमाणे ट्रोल झालं होतं, त्याप्रमाणे हे गाणंही ट्रोल होण्यास सुरुवात झाली आहे. 

सचिन पिळगावकर यांची टिंगल उडवली जात आहे. मराठीतल्या एकेकाळच्या दिग्गज अभिनेत्यावर आता अशी गाणी बनवण्याची वेळ आली का? असा सवाल लोक करत आहेत. 

दिमाग मै भुसा गाण्याचा व्हीडिओ-

याआधीचं गाणं झालं होतं ट्रोल-

सचिन पिळगावकर यांनी केलेलं अशा प्रकारचं हे काही पहिलंच गाणं नाही. याआधी त्यांनी मुंबई अँथम नावाने ‘आमची मुंबई’ नावाचं गाणं केलं होतं. त्या गाण्यात स्वतः सचिन पिळगावकर झळकले होते. गाणं पाहताच लोकांनी त्यांना ट्रोल केलं होतं.

लाईकपेक्षा डिसलाईक करणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे यूट्यूबवरुन हे गाणं हटवण्यात आलं होतं. सचिन पिळगावकर यांनी स्वतः याप्रकरणी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. वाईट वाटल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं.

पाहा आमची मुंबई साँग-

IMPIMP