नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूूत्रे सचिन पायलट किंवा ज्योतिरादित्य शिंदे यांना करण्यात यावं, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी केली आहे.
सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे या दोन्हीही नेत्यांचा गांधी घराण्यावर विश्वास आहे. या दोघांपैकी एकाला पक्षाचे अध्यक्षपद दिल्यास ते पक्षासाठी चांगले काम करतील, असा विश्वास देवरा यांनी व्यक्त केला आहे.
ज्योतिरादित्य शिंदे हे मध्यप्रदेशामधील काँग्रेसचे वजनदार नेते आहेत. ते पक्षाचे सरचिटणीसही आहेत. तर सचिन पायलट हे राजस्थानचे उपमुख्यमंत्री आहेत.
काँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष असला तरीही पक्षाचा अध्यक्ष हा तरुण आणि लढवय्या असावा, अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने राहुल गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यावर सातत्याने घराणेशाहीचा आरोप केल्याने ते नाराज झाल्याचंही बोललं जात आहे. यामुळे त्यांनी प्रियांका गांधींनाही अध्यक्षा होणार नसल्याचं सांगितलं.
राहुल गांधींनी आपला निर्णय बदलावा आणि पक्षाचं अध्यक्षपद पुन्हा स्विकारावं अशी मागणी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केली होती. मात्र राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम असल्याने काँग्रेसला अध्यक्ष निवडण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“जम्मू काश्मीरचा करार पंडित नेहरुंनी केला, सरदार पटेलांनी नाही”
-काँग्रेसला मोठा धक्का; राज्यसभेतील ‘या’ महत्वाच्या नेत्याचा राजीनामा
-अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयातच सहा शेतकऱ्यांनी केलं विष प्राशन