रूप बदलणाऱ्या राज ठाकरेंवर काँग्रेसचा पहिला वार!

मुंबई |  नव्या झेंड्यासोबत मनसेने नवा अजेंडादेखील समोर ठेवला आहे. मनसेने महाराष्ट्र शासनाच्या कारभारावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी शॅडो कॅबीनेटची घोषणा केलीये. मनसेच्या याच घोषणेवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली आहे.

14 वर्ष सातत्याने शॅडोमध्येच राहिलेली ही संघटना आहे, असं म्हणत त्यांनी मनसेच्या नव्या संकल्पनेवर टीका केली. तर  मनसे 14 वर्ष कधी प्रकाशात आलीच नाही, असं म्हणत मनसेला चिमटा देखील काढला.

मनसे जर शॅडो कॅबीनेट करत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा…. दरवर्षी त्यांना अश्या नवनवीन कल्पना सुचत असतात त्यातीलच ती एक कल्पना आहे. त्यामुळे हरकत नाही. विरोधी पक्ष मजबूत असली पाहिजे आणि सरकारवर विरोधी पक्षाचं लक्ष असलं पाहिजे ही आमची भूमिका आहे, असं सावंत म्हणाले.

शॅडो कॅबीनेट म्हणजे नेमकं तरी काय??-

शॅडो कॅबीनेट म्हणजे नक्की काय??-

सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधकांचं समांतर मंत्रिमंडळ.

शॅडो कॅबीनेटमधल्या मंत्र्यांना शॅडो मंत्री असं म्हटलं जातं.

शॅडो मंत्र्यांना कोणतेही अधिकार नसतात.

सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची चौफेर पडताळणी करण्याची जबाबदारी शॅडो कॅबीनेटवर असते.

-मुंबईतलं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं यांचं संपूर्ण भाषण- Raj thakceray uncut Speech 

महत्त्वाच्या बातम्या-