हिरेन प्रकरणातील ती मर्सिडीज भाजप नेत्याची? सचिन सावंत यांचा पुराव्यांसह धक्कादायक खुलासा!

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मनसुख हिरेन प्रकरण आणि मुकेश आंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फो.टकाच्या गाडीमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. एकमेकांशी संबंधीत असलेल्या या दोन्ही प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाची खेळी चालू आहे. याप्रकरणी रोज काही न काही तरी नवीन माहिती समोर येत आहे.

एनआयए या प्रकरणाचा शोध घेत आहे. याप्रकरणाचा तपास करत असताना आता एनआयच्या हाती एक मर्सिडीज कार देखील लागली आहे. या कारचा संबंध भाजपच्या एका नेत्याशी असल्याचा आ.रोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

सचिन सावंत यांनी याबद्दल एक ट्विट केलं आहे. तसेच त्यांनी पुराव्यासाठी काही फोटो देखील शेअर केले आहेत. सचिन सावंत यांच्या या ट्विटमुळे मनसुख हिरेन प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनसुख हिरेन यांचा ज्या दिवशी मृ.त्यू झाला होता. यादिवशी त्यांनी एका मर्सिडीज गाडीतून प्रवास केला होता. सचिन सावंत यांनी याच मर्सिडीज बरोबरचा भाजपचे ठाण्यातील पदाधिकारी देवेन हेमेंत शेळके यांचा फोटो ट्विट केला आहे.

तसेच मनसुख हिरेन यांचा ज्या दिवशी मृ.त्यू झाला त्या दिवशी हिरेन यांनी याच गाडीतून प्रवास केला होता याबद्दल भाजप नेत्यांनी खुलासा करावा, अशी मागणी सचिन सावंत यांनी ट्वीट करत केली आहे. सावंत यांनी देवेन हेमंत शेळके यांचं भाजपच्या पदाधिकारीपदी झालेल्या नियुक्तीचं पत्र देखील ट्विट केलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फो.टकांनी भरलेली गाडी मिळाली होती. सध्या एनआयएकडून या जिलेटीन गाडीचा देखील त.पास केला जात आहे. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या नावावर होती. यानंतर काही दिवसांनी हिरेन यांचा संशयास्पद मृ.त्यू झाला.

मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृ.तदेह सापडल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर राज्यात राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये या प्रकरणावरून आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी चांगलीच रंगलेली दिसत आहे.

मनसुख हिरेन यांच्या मृ.त्यूनंतर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या प्रकरणी विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मुलानं आईच्या कानशिलात लगावली, अन् आईनं जागेवर प्रा.ण सोडले; पाहा व्हिडिओ

धुळ्यात भर रस्त्यात दीर-भावजयीचा दा.रु पिऊन राडा, पोलिसांनाही केली शि.वीगाळ…; पाहा व्हिडिओ

‘एक वर्ष जनता ज्याचा शोध घेत होती, तो तिघाडीचा किमान समान कार्यक्रम हाच का?’; भाजपच्या ‘या’ नेत्याचा सरकारवर हल्लाबोल