क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर म्हणतो, मी ‘या’ खेळाडूच्या खरंच प्रेमात पडलोय!

मुंबई |  रविवारी लॉर्डसवर न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चित्तथरारक विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. प्रेक्षकांमधील सळसळता उत्साह, क्षणाक्षणाला वाढत जाणारी उत्कंठा, अंगावर येणारे रोमांचं आणि शेवटी सामन्याचा निकाल इंग्लंडचा विजय…. इंग्लंडचं जगभरातून कौतूक झालं. पण त्याच्याबरोरबर किंबहुना समसमान कौतूक झालं ते न्यूझीलंडचं आणि कर्णधार केन विल्यमसन याचं!

क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केन विल्यमसन याच्यावर शब्द-फुलांचा वर्षाव केला आहे. त्याने दाखवलेला जिगरबाज खेळ आणि त्याचा मैदानावरील वावर पाहून मी त्याच्या खरोखर प्रेमात पडलोय, असं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.

एवढं दडपण असताना देखील बेन स्टोक्सने अंतिम सामन्यात उत्तम खेळी केली. त्याच्याकडे ते कौशल्य आणि प्रतिभा आहे. पण मला केनने देखील प्रभावित केलं आहे. त्याने ज्या प्रकारे संघाचे नेतृत्व केलं… ज्या प्रकारे मैदानावर वावरला… त्याचं हे वागणं खरोखर कौतुक करण्यासारखं होतं, असं सचिनने म्हटलं आहे.

बेन स्टोक्सच्या खेळीने त्याने जगभरातील क्रिकेट रसिकांची मने जिंकली. तो ज्या पद्धतीने अखेरपर्यंत लढला ते कौतुकास्पद होतं, अशा शब्दात सचिनने बेन स्टोक्सचं देखील कौतुक केलं आहे.

लॉर्डवर खेळला गेलेला न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातला सामना पुढची अनेक दशकं क्रिकेट रसिक चवीने चाखतील आणि त्याचं पुन्हा-पुन्हा वर्णन करत राहतील.

दरम्यान, क्रिकेटचा जन्मदाता इंग्लंड इतिहासात पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविजेता बनला आहे.