खेळ

रोजंदारीवर काम करणाऱ्या 4 हजार लोकांना सचिनची आर्थिक मदत

मुंबई | कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने 17 मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. या काळात मजूर-कामगार आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. समाजातील अनेक महत्वाच्या व्यक्ती या लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने रोजंदारीवर काम करणाऱ्या 4 हजार लोकांना आर्थिक मदत केली आहे. यात मुंबई महापालिकेत शिक्षण घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या मुलांचाही समावेश आहे.

सचिनने High5 या NGO ला ही आर्थिक मदत केली आहे. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या संस्थेला शुभेच्छा देत, गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी आपण छोटीशी मदत करत असल्याचं सांगितलं आहे.

सचिनने याआधीही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीला प्रत्येकी 25 लाखांची मदत केली आहे. तसेच सचिनने मुंबईत 5 हजार लोकांच्या अन्न-धान्याची सोय केली होती.

 

महत्वाच्या बातम्या-

-नागरिकांनो घाबरू नका; भारत कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार-डॉ. हर्षवर्धन

-विधानपरिषद उमेदवारीबाबत शशिकांत शिंदे यांचा मोठा खुलासा

-“ज्या मुंबईने आम्हाला पोसलंय, तिला संकटकाळात सोडून जाणार नाही”

-चीनकडे कोरोनाचा फैलाव रोखण्याची क्षमताच नव्हती- डोनाल्ड ट्रम्प

-कोणत्याही लसीशिवाय कोरोना निघून जाणार; डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य