सचिनने व्हॅलेंटाईनदिनी जागवली पहिल्या प्रेमाची आठवण!

मुंबई | व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे आपल्या मनातील साऱ्या भावना आपल्या जोडीदाराला सांगून मोकळं व्हायचं असा हा दिवस…. आपल्या आवडत्या व्यक्तीला सरप्राईज देण्याचा हा दिवस…! याच दिवसांचं निमित्त आणि औचित्य साधत भारतरत्न सचिन तेंडुलकर याने आपल्या पहिल्या प्रेमाला उजाळा दिला आहे.

तरुणाईसाठी पर्वणीचा असलेल्या प्रेमाच्या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीला उजाळा दिला आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केलाय. ‘माझं पहिलं प्रेम’ असं कॅप्शन त्याने या व्हीडिओला दिलं आहे. क्रिकेट हेच माझ पहिलं प्रेम आहे असंच त्याने या व्हीडिओमधून सांगितलं आहे.

सचिन तेंडुलकरने जो व्हिडिओ शेअर केला आहे तो ऑस्ट्रेलियातील चॅरिटी सामन्यापूर्वीच्या सरावादरम्यानचा आहे. यामध्ये तो नेटमध्ये प्रॅक्टीस करत असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, सचिनने त्याच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठ्या असलेल्या अंजलीशी प्रेमविवाह केला आहे. या प्रेमविवाहाच्या आठवणी त्याने अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना जाग्या केल्या आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-दानशूर भिकारी….. मंदिराला दिले 8 लाख रूपये!

-‘व्हॅलेंटाईन डे’ चा प्लॅन काय विचारताच आदित्य ठाकरे लाजले; म्हणाले…

-औरंगाबादचं नाव ‘संभाजीनगर’ करून मुख्यमंत्री सरप्राईज देणार; चंद्रकांत खैरेंचं मोठं वक्तव्य

-इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा; अंद्धश्रद्धा निर्मुलन समितीची मागणी

-खरे चाणक्य कोण शरद पवार की तुम्ही??; अमित शहांनी दिलेलं उत्तर तुफान व्हायरल