13 तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना अ.टक, वाचा काय आहे प्रकरण

मुंबई| प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फो.टके सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अ.टक केली आहे. वाझे यांनी अ.टकेपासून वाचण्यासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्या.यालय ठाणे येथे अंतरीम जा.मिनासाठी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी 19 मार्चला सु.नावणी होणार होती.

सचिन वाझेंच्या अटकेनंतर ठाण्यातून आणखी तिघांना अ.टक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शनिवार सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत वाझेंची चौ.कशी सुरू होती. मनसुख हिरेन मृ.त्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका सं.शयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या रडारवर होते. वाझेंचा अंबानी यांच्या घरासमोर स्फो.टकांची गाडी उभी करण्यात सहभाग घेतल्याचा आ.रोप करण्यात आलाय.

सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अ.टक करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांत अंबानी स्फो.टके प्रकरणातही सगळ्यात मोठी घडामोड म्हणून पाहिली जाते आहे. त्यामुळेच सचिन वाझेंच्या अ.टकेनं खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात चर्चेत असेलेले पो.लfस आधिकारी सचिन वाझे यांची क्रा.ईम ब्रा.न्चमधून बदली करण्यात आली. वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली. पो.लिस मुख्यालयातून सचिन वाझे यांच्या बदलीसंदर्भात आदेश काढण्यात आले.

आज सकाळी 11 वाजता त्यांना न्या.यालयात हजर करण्यात येईल. यावेळी त्यांच्या पो.लिस को.ठडीची मागणी केली जाईल. त्यामुळे आता पो.लीस को.ठडीतील चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मनसुख हिरेन मृ.त्यू प्रकरणात वा.दाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पो.लिस निरीक्षक सचिन वाझे यांची बदली झाल्यानंतर त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस लक्ष वेधून घेतलं होतं. जगाला आता गुडबाय करायची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस वाझेंनी ठेवल्यामुळे ख.ळब.ळ उडाली. कालच वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली करण्याचे आदेश निघाले होते.

मनसुख हिरेन यांचा सं.शयास्पद मृ.तदेह सापडल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर राज्यात राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये या प्रकरणावरून आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी चांगलीच रंगलेली दिसत आहे.

मनसुख हिरेन यांच्या मृ.त्यूनंतर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या प्रकरणी विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

बाईक स्टंट करत रोमान्स करणं कपलला पडलं महागात…, पाहा व्हिडीओ

ओट्स खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

धक्कादायक! आणखी एका टिकटॉक स्टारच्या आत्मह.त्येने कला विश्वात खळबळ

गॅस सिलेंडरवर आता 300 रुपयांची सूट मिळणार! वाचा काय आहे ही भन्नाट योजना?

केवळ 5000 रुपये गुंतवा आणि लाखो रुपये कमवा! सरकार देखील करेल मदत