मुंबई | आरे आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले, आता दाऊदवरील गुन्हे मागे घेऊन ठाकरे सरकार त्याला क्लीनचीट देणार, असं म्हणत भाजपचे नेते मोहित भारतीय यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. यालाच शिवसेना नेते सचिन अहिर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
राज्यात सत्ता गेल्यामुळे भाजप नेते मोहित भारतीय दु:खी झाले आहेत. शिवसेना तुमच्यासोबत युतीमध्ये होती तेव्हा काम करु दिलं नाही, आता शिवसेना काम करतेय त्यावर टीका करत आहात, असं सचिन आहिर यांनी म्हटलं आहे.
भाजपने दाऊदला भारतात परत आणण्याचं आश्वासन दिलं, त्यावरील काही अपडेट्स मिळतील का? असा सवालही सचिन अहिर यांनी मोहित भारतीय यांना केला आहे.
दरम्यान, युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य जय सरपोतदार यांनीही ट्विट करत मोहित भारतीय यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पंकजा मुंडेंच्या फेसबुकवर पुन्हा ‘कमळ’ अवतरलं! – https://t.co/7jC6HE0MN6 @Pankajamunde @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
फडणवीस यांच्या भाषणात सत्तेचा दर्प अधिक होता… हाच दर्प भाजप ला नडला- शरद पवार-https://t.co/qpcMs2JEm5 @PawarSpeaks @Dev_Fadnavis @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
भाजपच्या या नेत्यान बाळासाहेबांचा ‘तो’ व्हीडिओ शेअर करत शिवसेनेला डिवचलं! – https://t.co/hTNNLCd9Hs @BJP4India @sambitswaraj @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019