Top news मनोरंजन

अभिनेता अजय देवगनला मोठा धक्का; घरातील ‘या’ खास व्यक्तीला कायमचं गमावलं!

मुंबई | अभिनेता अजय देवगणने आपल्या अभिनयाने आपला एक खास चाहतावर्ग तयार केला आहे. आपल्या सोशल मीडिया खात्यावरुन तो आपल्या चाहत्यांशी नेहमीच जोडला गेलेला आहे. आपल्या सुख दुःखाच्या गोष्टी तो याच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

नुकतंच अजय देवगननं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केलं आहे. हे ट्विट वाचून अनेक चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत. अजय देवगननं या ट्विटच्या माध्यमातून अत्यंत दुःखद बातमी आपल्या चाहत्यांना सांगितली आहे.

अजय देवगन हा प्रसिद्ध स्टंट डायरेक्टर वीरु देवगण यांचा मुलगा, त्यांना अजूनही एक मुलगा होता, त्याचं नाव अनिल देवगण… मात्र ते आज आपल्यात नाहीत, कारण नुकतंच त्यांचं नि.धन झालं आहे. अजय देवगनला आपला भाऊ गमवावा लागला आहे.

आपल्या ट्विटर खात्यावरुन अजय देवगनने याची माहिती दिली आहे. काल रात्री मी माझा भाऊ अनिल देवगनला गमावलं आहे. त्याच्या मृ.त्यूनं आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. मला आणि एडीएफएफला त्याची अनुपस्थितीत रोज जाणवत राहील, असं अजय देवगननं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अजय देवगननं आणखीही माहिती आपल्या ट्विटमध्ये दिली आहे. सध्या कोरोनासारखा साथीचा रोग असल्याचं कोणत्याही शोकसभेचं किंवा श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन केलं नसल्याचं अजय देवगननं सांगितलंय.

अजय देवगनच्या भावाच्या मृ.त्यूच्या घटनेनं अभिनेत्री काजोललाही दुःखी आहे. देवर आणि भाबीचे चांगले संबंध होते. अतिशय हसऱ्या आणि चांगल्या स्वभावाचे अनिल देवगण सर्वांचीच मनं जिंकून घेत असत त्यामुळे सर्वच कुटुंबाला त्यांचा लळा लागलेला होता.

दरम्यान, अनिल देवगन यांच्या नि.धनाच्या बातमीने अजय देवगनच्या चाहत्यांनाही दुःख झालं आहे. एका चाहत्याने लिहिले आहे की, ” देव अनिल सरांच्या आत्माला शांती मिळो. देव तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हा धक्का सहन करण्याचे सामर्थ्य देवो, तुमच्या दुःखात मी सहभागी आहे.

अजय देवगनचे वडील वीरू देवगन बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टंट डायरेक्टर होते, त्यांचं गेल्या वर्षीच नि.धन झालं आहे. 27 मे 2019 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. वडिलांच्या पहिल्या पुण्यतिथी दिनानिमित्त अजय देवगनने त्यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट देखील लिहिली होती.

दरम्यान, अनिल देवगन यांच्या निधनानं अजय देवगणला मोठा धक्का बसला आहे. अनिल देवगन यांचा त्याला खूप चांगला सपोर्ट होता. मात्र आता तेच या जगात न राहिल्याने त्याच्यावर आभाळ कोसळलं आहे.

अजय देवगननं केलेलं ट्विट-

 

महत्त्वाच्या बातम्या-