“शरद पवारांचं आमंत्रण म्हणजे लबाडाघरचं जेवण, जेवल्याशिवाय काही खरं नाही”

पुणे |   शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या आमदारकीची खुली ऑफर देण्यात आली आहे. तसंच त्यासंबंधीच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. यावरच बोलताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी आणि शरद पवार यांना टोला लगावला आहे.

राजू शेट्टी यांनी आमदार व्हावं अशी शरद पवारांची इच्छा आहे पण शरद पवारांचं आमंत्रण म्हणजे लबाडाघरचं जेवणं आहे. जेवल्याशिवाय काही खरं नाही, असा उपहासात्मक टोला सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना लगावला आहे. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाविकास आघाडीने राजू शेट्टी यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करावी. मी स्वतः त्यांना पाठींबा देईन आणि मी त्यांची जंगी मिरवणूक देखील काढेन, असं आव्हान सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीला दिलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टींच्या घरी जाऊन त्यांच्याशी आमदारकीबाबत चर्चा केली आहे. मात्र माझं शरद पवार यांच्याशी याविषयावर अद्याप बोलणं झालेलं नाहीये. लवकरच मी त्यांच्याशी बोलने तसंच आमच्या पक्षातील लोकांशी देखील बोलेन आणि त्यानंतर आमचा निर्णय आम्ही जाहीर करू, असं शेट्टी यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर शक्ती कपूर यांचं रोखठोक वक्तव्य

-मुंबईत आढळली कोरोनाची नवी लक्षणं; ‘ही’ लक्षणं दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जा!

-उषा नाडकर्णी ढसढसा रडल्या, सुशांतच्या आठवणीने व्याकूळ!

-सुशांतच्या आत्महत्येला नवं वळण?; सुशांतच्या ‘या’ मैत्रिणीचा पोलीस जबाब घेणार

-असाही एक मुख्यमंत्री, स्वत:च्या सासऱ्यांचं निधन झालं असताना उद्धव ठाकरेंनी नियोजित बैठक घेतली!