मुंबई | राज्याचे माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीला प्रामुख्यानं लक्ष केलं आहे. आताही त्यांनी राष्ट्रवादीवर जहरी टीका केली आहे.
राज्यातील सरकार हे मातोश्रीवरून नाहीतर सिल्वर ओकवरून चालतं. बाप मुख्यमंत्री तर लेकरू पर्यटनमंत्री आहे यांना कोकणचा विकास का करत येत नाही?, असा सवाल खोत यांनी ठाकरेंना केला आहे.
राष्ट्रवादीनं कसं लुटावं यासाठी एक विद्यापीठ सुरू करावं. राष्ट्रवादीनं भ्रष्टवादी विद्यापीठ महाराष्ट्रात सुरू करावं, जगातील लोक इथं प्रवेश घेतील, असा टोला खोत यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे.
नुकतंच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि खोत यांच्यात जोरदार शाब्दिक लढाई झाली होती. त्यानंतर खोत यांनी आता थेट पवार घराला लक्ष्य केलं आहे.
जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा या अभियानाला घेऊन खोत कोकणातून सुरूवात करत आहेत. कोकणासह राज्यात हे अभियान जाणार असल्याचं खोत म्हणाले आहेत.
राज्यात अनेक समस्या आहेत त्या राज्य सरकारकडून सोडवण्यात येत नाहीत. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी सर्वजण सध्या त्रस्त आहेत, असंही खोत म्हणाले आहेत.
खोत यांच्या जहरी टीकेनंतर राज्यात पुन्हा एकदा जोरदार वाद निर्माण झाला आहे. खोत हे भाजपच्या सहाय्यानं टीका करत असल्याचं उत्तर महाविकास आघाडीचे नेते देत आहेत.
दरम्यान, खोत यांनी फक्त राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर भाष्य केलं नाही तर शिवसेना नेत्या खासदार भावना गवळी यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाबमध्ये मोठा राडा! शिवसेना आणि शीख संघटना एकमेकांना भिडले, SHO जखमी
“…तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार”
‘…तर कुणी मानसिक रोगी’; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला
मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर बलात्काराचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
“तुम्हाला कळत नसेल तर अजित पवारांना विचारा…”; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला