“बारामतीचा गडी एवढा हुशार कसा?, मला वाटतं की हा ब्रह्मदेवाला चुकवून…”

सांगली | बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार (SharadPawar) यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत? हे मी वर गेल्या-गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे, असा खोचक टोला सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना लगावलाय.

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदारनिधीतून आटपाडी तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार किरीट सोमय्या, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला. यावेळी  सदाभाऊ खोत बोलत होते.

मला वाटतं की हा गडी ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असेल. इतका बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणार नाही, असं म्हणत खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

नुकतीच ब्राह्मण समाजाने शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवारांनी ट्वीट करून दुसऱ्यांच्या आरक्षणाला तुम्हाला विरोध करता येणार नाही, असं ब्राह्मण समाजाला सांगितलं. मात्र आम्ही असं म्हटलंच नाही, हे ब्राह्मण समाज आता ओरडून सांगत आहे. त्यामुळे बारामतीचा गडी कसा आला, हे आपण मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहोत, असं खोत म्हणालेत.

मी पुन्हा येईन, हे वाक्य आपल्याला खरं करायचं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं आहे, असंही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

दरम्यान, अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त पोस्टनंतर सर्वच स्तरांतून तिच्यावर टीकेचा भडीमार झाला.

महाविकास आघाडीतील पक्षांसह भाजपमधील काही नेत्यांनीही तिला समज दिली आहे. अशात आमदार सदाभाऊ खोत यांनी मात्र केतकी चितळेचं समर्थन केलं आहे. केतकीचा मला अभिमान आहे, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी तिची पाठराखण केली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची प्रकृती बिघडली!

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं; मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताच केली हकालपट्टी 

 ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला केएल राहुल

“शरद पवार मला भेटले तर मी त्यांच्या पायाही पडेन” 

“भारतातील मुसलमानांचा मुघलांशी संबंध नाही, पण त्यांच्या बायका कोण होत्या?”