सुप्रिया सुळेंवर वैयक्तिक टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर सदानंद सुळे संतापले

मुंबई | भाजपनं आज ओबीसी राजकीय आरक्षणासाठी मोर्चा काढला होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका केली. या टीकेला सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी फेसबुक पोस्ट करत उत्तर दिलंय.

हे आहेत महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि हे सुप्रिया सुळेंबद्दल बोलत आहेत मला नेहमीच वाटत होतं हे स्त्री द्वेषी आहेत जिथे शक्य होईल तिथे महिलांचा अपमान करतात, असं सदानंद सुले म्हणाले.

मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे, ती गृहिणी आहे, ती आई आहे आणि यशस्वी राजकारणी आहे. देशातील इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे चंद्रकांत पाटलांनी सर्वच महिलांचा अपमान केलाय, असंही संदानंद सुळे म्हणालेत.

कशाला राजकारणात राहता, घरी जा, स्वयंकाप करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

आमचं सरकार दडपशाहीचं नाहीये, विरोधकांना तेही भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना असं वाटत असेल की त्यांनी माझ्या विधानावर बोलावं, तर तो त्यांचा अधिकार आहे, त्यात गैर काय, मी इतका काही त्याचा विचार करत नाही, त्यांना वाटलं म्हणून ते बोलले असेल, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर उत्तर दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला रामराम

महागाईने त्रस्त नागरिकांसाठी आनंदाची बातमी; सरकारचा आणखी एक मोठा निर्णय 

“मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच…”; ज्ञानवापी प्रकरणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य 

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पुढील 4 दिवस पाऊस झोडपून काढणार