मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षाकडून उमेदवार असतील, अशी चर्चा गेल्या आठवड्यात सुरू होती.
शरद पवार यांच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) देखील प्रचंड आग्रही होत्या. पण पवारांनी तो प्रस्ताव नाकारला आहे. आता यावर प्रतिक्रिया देत गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवर बोचरी टीका केली आहे.
मेडिकलच्या प्रवेशासाठी सीईटीची परीक्षा होते. आयएएस होण्यासाठीही परीक्षा असते मला वाटते की, वाजवण्यासाठी चर्चा ठीक आहे. परंतु राष्ट्रपतिपदासाठी बौद्धिक पातळी आवश्यक आहे, अशी टीका सदावर्ते यांनी केली आहे.
राष्ट्रपती पदावर उंची गाठलेली माणसं होती. शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार ते वयोवृद्ध आहेत. त्यांनीच सांगावं त्यांच्याकडे कुठली उंची आहे, असा प्रश्न विचारत सदावर्ते यांनी शरद पवार यांची खिल्ली उडवली.
राष्ट्रपती पदासाठी उंची लागते त्यामुळे त्यांनीच विचार करावा, या पदावर जायचं की नाही, असंही सदावर्ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी रणनीती, म्हणाले…
राज्यात मान्सून बरसणार, ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा जारी
सावधान! राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आजही लक्षणीय वाढ, वाचा आकडेवारी
“20 जूनला देवेंद्र फडणवीस पुन्हा चमत्कार करणार”
“पंकजा मुंडेंनी स्वत:चा पक्ष स्थापन केला तर राजकीय भूकंप येईल”