पुणे महाराष्ट्र

भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी निवड मुलाची झाली अन् वडिलांचा मतदारसंघ आणि चिन्ह फिक्स झालं!

सांगली |  सांगली जिल्ह्याच्या भाजप युवा मोर्च्याच्या अध्यक्षपदी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांंचे पुत्र सागर खोत यांची निवड झाली आहे. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिलं आहे.

सदाभाऊ खोत यांची भाजपसोबत युती आहे. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी रयत क्रांती संघटनेसाठी काही जागा मागितल्या आहेत. त्यात इस्लापुरच्या जागेचा देखील समावेश आहे. सदाभाऊ खोत इस्लापुरमधून राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्याविरोधात लढण्याची शक्यता आहे.

रयत क्रांती संघटना विधानसभा निवडणूक कोणत्या चिन्हावर लढणार हे अस्पष्ट होतं. मात्र सागर खोत यांच्या निवडीने रयत क्रांती संघटना भाजपच्या कमळ चिन्हावरच लढणार असल्याचं निश्चित झालं आहे.

भाजयुमोच्या सांगली जिल्हाध्यक्षपदासाठी सागर खोत यांच्या नावाची कसलीही चर्चा नव्हती मात्र चर्चा नसतानाही त्यांची निवड झाली आहे. त्यांच्याअगोदर हे पद गोपीचंद पडळकर यांच्याकडे होतं. मात्र त्यांच्या वंचितमध्ये जाण्याने हे पद रिक्त होतं.

दरम्यान, सदाभाऊ खोत इस्लामपुरमधून विधानसभा लढणार की दुसरा कुठला मतदारसंघ निवडणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

IMPIMP