तैमूर आणि करिनासोबत फिरताना सैफनं घातला नाही मास्क; ट्रोल झाल्यावर दिलं ‘हे’ कारण

मुंबई | कोरोनाने संपूर्ण जगालाच विळखा घातला आहे. मोठं मोठे कलाकरही या महामारीच्या तावडीतून सुटू शकले नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. मात्र ,सध्या लॉकडाऊनच्या अटी शिथिल करण्यात येत असल्यामुळे लोक घराबाहेर पडू लागले आहेत. अश्यातच, काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खान पत्नी करीना कपूर खान आणि लेक तैमुरसोबत मरीन ड्राइव्ह परिसरात मास्क न लावता फिरताना दिसला होता.

तोंडाला मास्क न लावता फिरताना दिसल्यामुळे सैफ अली खानला चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. सैफने आत्तापर्यंत त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु, आता मात्र त्याने ट्रोलिंगवरचे मौन सोडत ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत मास्क न घालण्याचे कारण सांगितलं आहे.

“लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्यानंतर आम्ही तैमुरसोबत फिरायला बाहेर पडलो होतो. खरं तर आमच्या तिघांकडे त्यावेळी मास्क होते. परंतु त्यावेळी फिरत असताना आमच्या आसपास कोणी नव्हतं म्हणून तो मास्क काढून ठेवला होता,” असं सैफ अली खान यावेळी म्हणाला.

पुढे सैफ असं ही म्हणाला, ” जसं आमच्या लक्षात आलं की समोरून काही लोक येत आहेत आणि त्या ठिकाणी लहान मुलांना नेण्याची परवानगी नाही, त्याक्षणी आम्ही चेहऱ्यावर मास्क लावून घरी परतलो. परंतु हे सत्य त्यावेळी कोणीही सांगितलं नाही. आम्ही जबाबदार आणि कायदेशीर नियमांचं पालन करणारे नागरिक आहोत. लॉकडाऊनच्या काळात आम्ही घरीच होतो. आतादेखील आम्ही फक्त आणि फक्त आमच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहोत.”

महत्त्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लावण्याचे प्रयत्न; ‘या’ महिन्यात होणार सत्तापालट?

नरेंद्र मोदींनी ‘या’ मराठी माणसावर दाखवला विश्वास; सुपूर्द केली ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी

जिच्यासोबत बहिण म्हणून काम केलं, तिच्यासोबतच ‘या’ अभिनेत्यानं लग्न केलं!

धक्कादायक! मांत्रिकाने चक्क मुलीच्या कुटुंबियांसमोर केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

केरळनंतर राजस्थानमध्ये माणुसकीला काळीमा; उंटासोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य