मनोरंजन

सैफने केलं स्मिता तांबेच्या अभिनयाचं कौतुक; म्हणाला…

मुंबई : ‘सॅक्रेड गेम्स’चे दूसरे पर्व 15 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर लाँच झाले. ह्या बहुचर्चित वेबसीरिजच्या दूसऱ्या पर्वात सैफ अली खानसोबत अभिनेत्री स्मिता तांबेही झळकली आहे. न्यू-क्लिअर बॉम्बच्या साखळीला शोधण्यामध्ये सिनिअर इन्स्पेक्टर सरताज सिंगला मदत करणारी सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट रमाच्या भूमिकेत स्मिता तांबे दिसून आलीय. स्मिता तांबेच्या ह्या भूमिकेबद्दल सध्या तिचं खूप कौतुक होत आहे. पण को-स्टार सैफ अली खानने दिलेली कॉम्पलिमेन्ट तिच्यासाठी सर्वाधिक महत्वाची आहे.

सैफ अली खान यांची मी खूप वर्षांपासून चाहती आहे. पहिल्यांदाच मी त्यांच्यासोबत काम करत होते. ते खूप मनमिळावू स्वभावाचे आहेत. सीन सुरू नसताना ते खूप चेष्टा-मस्करी करत असतात. पण एकदा का सीन सुरू झाला, की मग भूमिका वठवताना ते एकदम गंभीर होतात, असं स्मिता तांबे म्हणाली आहे.

चित्रिकरणावेळी माझे काम पाहून तू खूप इंटेन्स एक्टरेस आहेस ही त्यांनी दिलेली शाबासकी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे, असं सैफने तिच्या अभिनयाचे केलेल्या कौतुकामुळे स्मिता भाारावून गेली आहे.

स्मिता साकारत असलेली ‘रमा’ मुंबईतल्या शिवडीमध्ये कुटुंबासमवेत राहणारी, मुळची विदर्भातली दाखवली आहे. आपल्या कामाबद्दल प्रचंड निष्ठावान! अहोरात्र झोकून देऊन काम करणारी! 26/11 च्या हल्ल्यानंतर देशासाठी काहीतरी करून दाखवण्यासाठी ती पोलिसात भरती होते. मुंबईवर हल्ला करू पाहणाऱ्या दहशतवाद्यांचे गुप्त संदेश ‘डिकोड’ करताना ती दाखवली आहे.

नीरज घायवान ह्या दिग्दर्शकासोबतही स्मिताने पहिल्यांदाच काम केले. नीरज घायवान खूप शांत दिग्दर्शक आहे. तो खूप शांततेत काम करतो. अभिनेत्याला त्याच्या भूमिकेविषयी किंवा एखाद्या सीनविषयी समजावताना भारंभार माहितीने दाबून टाकत नाही.

गरजेची असलेलीच माहिती देऊन त्यावर अभिनेत्यालाही काम करून देण्याची मोकळीक देतो. त्यामुळे आपल्या कामावर आपली वेगळी छाप उमटतं असल्याचं स्मिताने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी ही नावं चर्चेत; कोणाची लागणार वर्णी???

-इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांचा ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम’ पुरस्कारानं सन्मान

-मी बिकाऊ नाही; भाजपच्या ‘या’ महिला खासदाराचं पंतप्रधानांना ट्वीट

-अरुण जेटलींची प्रकृती गंभीर; राष्ट्रपती घेणार भेट

-“भाजपचा फक्त जम्मू काश्मीरच्या जमिनीवर डोळा”

IMPIMP