मुंबई : सैफ आणि करिनाचा मुलगा तैमुरची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा असते. वाढती लोकप्रियता लक्षात घेता तैमुरच्या सुरक्षेसाठी सैफ-करिनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तैमूरच्या चाहत्यांसाठी हा निर्णय धक्कादायक म्हणावा असा आहे.
‘झी न्यूज’ने यासंदर्भात बातमी दिली आहे. अनेक वेळा तैमुरचे चाहते त्याच्या भोवती गराडा घालताना दिसतात. तैमुरच्या नॅनीला तसेच त्याच्यासोबत असलेल्या अन्य व्यक्तींना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो.
काही उत्साही चाहते तैमुरबरोबर फोटो काढता यावा यासाठी प्रचंड प्रयत्न करत असतात. मात्र या साऱ्या गोष्टींमुळे तैमुरचे आई वडील वैतागले आहेत. तैमूरला कोणताही शारीरिक किंवा अन्य त्रास होऊ नये यासाठी सैफ-करिनाने तैमुरसाठी अंगरक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसापूर्वी एका चाहत्याने तैमुरबरोबर फोटो काढण्याचा प्रयत्न केला होता. तैमुरच्या नॅनीने या चाहत्याला खडसावलं तरी तो ऐकायला तयार नव्हता. तैमुरला प्रमाणापेक्षाही जास्त प्रसिद्धी मिळत असल्यामुळे त्याची चिंता वाढत आहे.