नवी दिल्ली | नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे.
छत्तीसगडमधील अंबिकापूर येथील सैनिक शाळेत जनरल स्टाफसह विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
एकूण 20 रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या नोकरीसाठी इच्छुक असाल तर 14 जानेवारी 2022 पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात.
उमेदवारांना या पदांसाठी नोंदणी करायची असेल तर पोस्टाद्वारे अर्ज करावा लागणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षाच्या दरम्यान असणे अनिवार्य आहे.
सैनिक शाळेतील रिक्त पदे-
- जनरल स्टाफ (MTS)- 16 पदे
- समुपदेशक- 1 पद
- घोडेस्वारी प्रशिक्षक- 1 पद
- नर्सिंग सिस्टर (महिला)- 1 पद
- प्रयोगशाळा सहाय्यक- 1 पद
सैनिक शाळेत वरील 20 रिक्त पदांसांठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. जनरल पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी उमेदवाराने विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता व भरतीशी संबंधित इतर माहिती शाळेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
sainikschoolambikapur.org.in या अधिकृत वेबसाईटवर भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिसूचना उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोरोनाच्या विळख्यात, ट्विट करत दिली माहिती
…तर मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल- इकबाल चहल
देशात कोरोनाचा कहर, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, आता…
व्हिडीओ कॉल उचलताच तिने उतरवले कपडे त्यानंतर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार!
धक्कादायक! 59 डॉक्टरांना कोरोनाची लागण, ‘हे’ रूग्णालय ठरत आहेत हॉटस्पॉट